Mazagaon Dock Bharti 2024 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे, रिक्त जागांसाठी पदांची नावे नॉन एक्झीक्युटिव्ह पदे – हिपर ग्राइंडर, एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिकल, कॉम्प्रेसर अटेंडंट, डिझेल का मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रिशन, कनिष्ठ नियोजक अंदाजकार (सिव्हिल), पेंटर, पाईप फिटर, मिलराईट मेकॅनिक, स्टोर कीपर, रिगर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, हिंदी अनुवादक, फिटर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (मेकॅनिकल), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (इलेक्ट्रिकल),फायर फायटर, सेल मेकर, सुरक्षारक्षक शिपाई, युटिलिटी हँड सेमी स्किल, मास्टर वर्ग-1 असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे, शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई भरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2024 आहे नोकरी अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnukri.in
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई अर्ज शुल्क
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई भरती मध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु.354/- लागणार आहे राखीव प्रवर्गातील उमेदवार पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट दिलेली आहे.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई वयोमर्यादा
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई भरती अंतर्गत उमेदवारांना 18 ते 38 वर्ष आणि मास्टर वर्ग 01 ट्रेड साठी 48 वयोमर्यादा दिलेली आहे.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई शैक्षणिक पात्रता
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई मध्ये रिक्त पदांच्या एकूण 234 पदांकरिता भरती प्रसारित करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव नॉन एक्झीक्युटिव्ह असे आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी, डिप्लोमा,पदवी,अभियांत्रिकी,ITI पास उमेदवार आवश्यक आहे.शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती पदांनुसार बघण्यासाठी खालील दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई वेतनश्रेणी
पदांसाठी निवड केलेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन दिले जाणार आहे.
विशेष श्रेणी पदे – IDA-IX- रु.22000/- ते रु. 82180/-
कुशल पदे – GR-I (IDA-V)- रु.17,000/- ते रु.64,360/-
अकुशल पदे – GR-I (IDA-II) रु13,100/- ते रु.49,910/-
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई अर्ज प्रक्रिया
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
MDL अधिकृत वेबसाईट https://mazagondock.in वर लॉग इन करा.
करियर्स ऑनलाईन भरती ‘नॉन एक्झिक्युटिव्ह’ वर जा.
नॉन एक्झिक्युटिव्ह या टॅबवर क्लिक करून संबंधित तपशील भरून नोंदणी करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
नोंदणी पूर्ण करून दिलेल्या ई-मेल आयडीवर युजर आयडी व पासवर्ड मिळेल.
MDL ऑनलाइन पोर्टलवर युजर आयडी आणि पासवर्ड भरून लॉगिन करा.
आवश्यक माहीती भरून पासपोर्ट फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
आवश्यक असल्यास अर्जाचे शुल्क भरून प्रत भविष्यातील संदर्भासाठी तुमच्याकडे ठेवा.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई निवड प्रक्रिया
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई भरतीमध्ये निवड उमेदवारांची लेखी परीक्षा, जहाज बांधणी उद्योगातील अनुभव, व्यापार कौशल्य चाचणी यामधून करण्यात येईल निवड प्रक्रियेच्या पूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
Mazagaon Dock Recruitment Notification Important Dates
ऑनलाईन अर्ज लिंक सुरुवात होण्याची तारीख : 25 नोव्हेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहे शेवटच्या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज लिंक बंद होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |