KVK Latur Bharti 2024 : कृषी विज्ञान केंद्र लातूर येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. व्यक्त पदांचे नाव फार्म मॅनेजर T/4, सपोर्टिंग स्टाफ हे आहे. या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे आहे शैक्षणिक पात्रता,अर्ज पद्धती, महत्त्वाच्या तारखा व इतर आवश्यक माहिती खालील दिलेल्या लेखामध्ये अर्ज करण्या अगोदर काळजीपूर्वक वाचावी. पात्रवाची उमेदवारांना कृषी विज्ञान केंद्र लातूर भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.चांगल्या वेतनाची नोकरीची उमेदवारांना ही चांगली संधी आहे या संधीचा पुर्णपणे फायदा करून घ्यावा. नोकरी संदर्भातील विविध अपडेट साठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा. www.mahasarkarnukri.in
कृषी विज्ञान केंद्र लातूर भरती अर्ज शुल्क
कृषी विज्ञान केंद्र लातूर भरती अर्ज करण्याचे सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रू.500/- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी एसटी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट आहे.
कृषी विज्ञान केंद्र लातूर भरती वयोमर्यादा
कृषी विज्ञान केंद्र लातूर भरती मध्ये फार्म मॅनेजर पदासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्ष सपोर्टिंग स्टाफ या पदासाठी 25 वर्ष वयोमर्यादा देण्यात आली आहे.राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा मध्ये सरकारी नियमाप्रमाणे सुट.
कृषी विज्ञान केंद्र भरती शैक्षणिक पात्रता
कृषी विज्ञान केंद्र लातूर (KVK Latur) अंतर्गत रिक्त पदांच्या जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव फार्म मॅनेजर T/4, सपोर्टिंग स्टाफ हे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खालील टेबल मध्ये पदांनुसार बघून पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
फार्म मॅनेजर T/4 | मान्यता प्राप्त विद्यापीठातून कृषी व संबंधित विषयात बॅचलर पदवी. |
सपोर्टिंग स्टाफ | मॅट्रिक किंवा समकक्ष पास किंवा आय.टी.आय. पास |
कृषी विज्ञान केंद्र लातूर भरती अर्ज प्रक्रिया
सदरील पदांचे अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिलेला विहित नमुन्यात अर्ज परिपूर्ण भरावा व सोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व ओळखपत्र आणि पासपोर्ट आकारातील फोटो अर्जसोबत सोडून खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवावा अपूर्ण महितीसह पाठविलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, लातूर, एम.आय.डी.सी. प्लॉट क्रमांक- पी-160, हरंगुळ (ब), महादेव जवळ नगर, पोस्ट- गंगापूर, ता. जि.लातूर- 413 531
अर्जाचे शुल्क भरणे आवश्यक आहे अर्ज शुल्क भरण्याच्या सविस्तर सूचना मूळ जाहिरातीमद्धे दिलेल्या आहेत पूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
कृषी विज्ञान केंद्र लातूर भरती निवड प्रक्रिया
कृषी विज्ञान केंद्र लातूर मध्ये पदांच्या भरतीसाठी मुलाखतीद्वारे निवड केली जाईल पूर्ण माहितीसाठी खालील मूळ जाहिरात मध्ये माहिती बघावी.
Krishi Vigyan Kendra Latur Recruitment Important Dates
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 25 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज स्वीकारण्यात येत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 डिसेंबर 2024 आहे या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे बघा |