BMC Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवेतून भरावयाच्या रिक्त जागांसाठी एकूण 1846 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 1846 जागांसाठी पदांचे नाव हे कार्यकारी सहाय्यक (लिपिक) असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिली गेली आहे,शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे जाहिरातीमध्ये नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे. भरती अपडेट बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज शुल्क
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज करण्यासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क रु.1000/- लागणार आहे. इतर मागासवर्गीय राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 900/- रुपये लागणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका वयोमर्यादा
बृहन्मुंबई महानगरपालिका खुला प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 18 वर्ष व कमाल 43 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका वेतनश्रेणी
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन दिले जाणार आहे.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कार्यकारी सहाय्यक (लिपिक) | रु.25,500/- ते 81,100/- |
बृहन्मुंबई महानगरपालिका शैक्षणिक पात्रता
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 1846 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कार्यकारी सहाय्यक (लिपिक) आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये बघून शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण महितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | शैक्षणिक पत्राता |
कार्यकारी सहाय्यक (लिपिक) | उमेदवार मान्यताप्राप्त मंडळातून माध्यमिक शालांत परीक्षा 10 वी किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम प्रयत्नात वाणिज्य,विज्ञान,कला,कायदा, किंवा तत्सम विषयातून गुणांसह किमान 45% गुणांसह पास असणे आवश्यक आहे उमेदरांकडे एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.पदवीधर असणे आवश्यक आहे आणि इंग्रजी किंवा मराठी टायपिंग चाचणी प्रत्येकी किमान 30 श.प्र.मी गतीसह. |
बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज प्रक्रिया
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्याकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे अर्ज दिलेल्या खालील लिंकद्वारे थेट ऑनलाईन करता येईल अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे सुरू असलेल्या स्थितीत मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी असावा.
अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावी पासपोर्ट आकारातील फोटो आणि पांढर्या कागदावर सही करून अपलोड करणे आवश्यक आहे.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. संबंधित कार्यालयात किंवा यापूर्वी कोणते केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही सदरील पदांसाठी फक्त ऑनलाईन माध्यमातून अर्ज करणे आवश्यक आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये सरळसेवेने भरावयाच्या रिक्त पदांकरिता उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.
निवड प्रक्रियेच्या वेळी उमेदवारांना मूळ कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सादर करावी लागणार आहे परीक्षा स्वरूप व निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती खालील दिलेल्या मूळ जाहिरातीत नमूद करण्यात आली निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघून निवड प्रक्रिया वाचून घ्यायची आहे.
BMC Recruitment Notification 2024
ऑनलाईन अर्ज लिंक सुरू होण्याची तारीख : 20 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकार केले जाणार आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |