Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका मध्ये 63 पदांची भरतीसाठी थेट मुलाखती!!

Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या भरती करिता जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शस्त्रक्रिया सहाय्यक, ड्रेसर, न्हावी, वार्ड बॉय, पोस्टमार्टम अटेंडंट, हॉस्पिटल आया, मॉच्युरी अटेंडंट असे आहे. याबद्दल लागणारे शैक्षणिक पात्रता पदांनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. सदर पदांसाठी मुलाखतीची तारीख 26, 30 सप्टेंबर आणि 03-04 ऑक्टोबर 2024 आहे. भरतीच्या अपडेट्स दररोज बघण्याकरिता आमच्या वेबसाईटला भेट द्या.

ठाणे महानगरपालिका अर्ज शुल्क

ठाणे महानगरपालिका मध्ये पदांची निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार असल्याने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

ठाणे महानगरपालिका वयोमर्यादा

ठाणे महानगरपालिका भरती मध्ये शासन नियमाप्रमाणे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.

ठाणे महानगरपालिका शैक्षणिक पात्रता

ठाणे महानगरपालिका मध्ये एकूण 63 रिक्त जागा भरण्याची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव शस्त्रक्रिया सहाय्यक, ड्रेसर, न्हावी, वार्ड बॉय, पोस्टमार्टम अटेंडंट, हॉस्पिटल आया, मॉच्युरी अटेंडंट असे आहे. या पदांची लागणारे शैक्षणिक पात्रता खालील दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी पदा नुसार बघून घ्यायचे आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
शस्त्रक्रिया सहाय्यकमहाराष्ट्र राज्य शासन मान्यता असलेल्या शिक्षण मंडळातून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेतून जीवशास्त्र विषयासह पास.
शासन मान्यता प्राप्त संस्थेमधून ओ.टी टेक्नॉलॉजी मधील पदविका आवश्यक.
मान्यता प्राप्त विद्यापीठातून ओ.टी टेक्नॉलॉजी मधील पदवी असणाऱ्या उमेदवारांसाठी प्राधान्य.
शासकीय निमशासकीय /स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पिटल मधील शस्त्रक्रिया सहाय्यक किंवा समक्ष कामाचा तीन वर्ष अनुभव.
ड्रेसरमहाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून ड्रेसर अभ्यासक्रम पूर्ण व त्यानंतर एन.सी.टी.व्ही.टी. चे प्रमाणपत्र आवश्यक. शासकीय आणि मी शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेच्या दवाखान्यामध्ये ड्रेसर कामाचा 03 वर्षांचा अनुभव
पोस्टमार्टम अटेंडंट
न्हावीमहाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास ( SSC 10 वी) शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेकडून न्हावी बार्बर किंवा समकक्ष कामाचा 03 वर्ष अनुभव
मॉच्युरी अटेंडंटमहाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास ( SSC )
पोस्टमार्टम कामाचा 01 वर्षाचा अनुभव
वार्ड बॉयमहाराष्ट्र राज्य शासनाकडून मान्यता असलेल्या शिक्षण मंडळातून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
शासनमान्य संस्था रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेच्या दवाखान्यातून वाढवा या कामाचा 03 वर्षांचा अनुभव
हॉस्पिटल आयामहाराष्ट्र राज्य शासन म्हणण्याचा प्राप्त शिक्षण मंडळाकडून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास.
शासनमान्य संस्थांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य.
शासकीय किंवा निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेच्या हॉस्पिटल मधून दवाखाना आया या कामाचा 03 वर्ष अनुभव

वरील सर्व पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

ठाणे महानगरपालिका अर्ज प्रक्रिया

ठाणे महानगरपालिका भरती मध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतीतून केली जाणार असल्याने उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रांसह दिलेल्या खालील पत्त्यावर मुलाखती करिता 26, 30 सप्टेंबर, आणि 03,04 ऑक्टोबर 2024 या तारखेला हजर राहायचे आहे.

मुलाखतीसाठी पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, 3रा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल, अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे. या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

ठाणे महानगरपालिका मासिक वेतन

ठाणे महानगरपालिका भरती मध्ये वरील पदांसाठी मासिक वेतन हे 20000/- रुपये दिले जाणार आहे.

ठाणे महानगरपालिका निवड प्रक्रिया

ठाणे महानगरपालिका मध्ये निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून व जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment Notification 2024

मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख : 26, 30 सप्टेंबर आणि 03-04 ऑक्टोबर 2024 या तारखांना उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील दिलेल्या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकार केले जाणार नाही किंवा मुलाखत घेतली जाणार नाही दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, 3रा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल, अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉