Western Railway Bharti 2024 : पश्चिम रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 5066 जागांची ही भरती होत आहे. रिक्त जागांसाठी ट्रेड चे नाव फिटर, वेल्डर, कारपेंटर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, कोपा, मेकॅनिक मोटर व्हेईकल असे आहे. संपूर्णपणे माहितीसाठी उमेदवार खाली दिलेल्या मुळ जाहिरात समोर लिंक वर क्लिक करून पूर्ण माहिती बघू शकता.(WR) पश्चिम रेल्वे भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे,ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी पासून सुरू होत आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे. या पदांची आवश्यक शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा, अर्ज शुल्क,व नोकरी ठिकाण आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबत माहिती खाली दिलेली आहे पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. अशाच भरती अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
पश्चिम रेल्वे अर्ज शुल्क
पश्चिम रेल्वे (WR) भरती अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100/-रुपये लागणार आहे.आणि राखीव प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी पीडब्ल्यूडी व महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
पश्चिम रेल्वे वयोमर्यादा
पश्चिम रेल्वे भरती मध्ये 15 ते 24 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे वयोमर्यादेमध्ये शासकीय नियमाप्रमाणे सूट दिली जाईल.
पश्चिम रेल्वे शैक्षणिक पात्रता
पश्चिम रेल्वे (WR) अंतर्गत विविध रिक्त जागांची अप्रेंटीस पदांसाठी भरती जाहीर केली आहे रिक्त जागांसाठी फिटर, वेल्डर, कारपेंटर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, कोपा, मेकॅनिक मोटर व्हेईकल ट्रेड चे हे नाव आहे या पदांची शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून 50% गुणांसह 10+2 परीक्षा प्रणाली मध्ये 10 वी पास असणे आवश्यक आहे आणि सोबतच NCVT/SCVT संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
पश्चिम रेल्वे अर्ज प्रक्रिया
पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक द्वारे सादर करता येईल इतर कोणत्याही प्रकारे उमेदवारांची अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही उमेदवारांकडे सध्या वापरत असलेला मोबाईल क्रमांक व ईमेल पत्ता असणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्जातील माहिती संपूर्णपणे भरावी अपूर्ण अर्ज रद्द ठरविला जाईल आवश्यक लागणारी शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑक्टोबर 2024 असणार आहे.
ऑनलाइन अर्ज करताना खालील कागदपत्रांची स्पष्ट व स्वाक्षरी केलेली स्कॅन केलेली कॉपी अपलोड करणे आवश्यक आहे.
एस.एस.सी. गुणपत्र- दहावी किंवा त्याच्या समक्ष गुणपत्र
जन्मतारखेचे प्रमाणपत्र
10वी प्रमाणपत्रात किंवा मार्कशीट मध्ये जन्मतारीख असायला हवी. किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
ITI मार्कशीट.
ज्या ट्रेड साठी अर्ज करणार आहे त्या ट्रेडच्या सर्व सेमिस्टरची एकत्रित गुणपत्रक किंवा तात्पुरते राष्ट्रीय ट्रेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय ट्रेड प्रमाणपत्र
NCVT द्वारे लागू केलेले किंवा NCVT SCVT द्वारे तात्पुरते प्रमाणपत्र.
जात प्रमाणपत्र
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी एससी/ एसटी ओबीसी.
अपंगत्व प्रमाणपत्र
पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी.
रंगीत फोटो रंगीत फोटोचा आकार 3.5 cm.x3.5 cm जो अर्ज करण्याच्या तारखे आधी तीन महिन्यांच्या आत काढलेला असावा JPEG/JPEG फॉरमॅटमध्ये 100 DPI, आणि फाईलचा आकार 20 के.बी. ते 70 के.बी. च्या दरम्यान असावा.
स्वाक्षरी
उमेदवारांनी स्कॅन केलेली स्वाक्षरी 3.5 cm x 3.5 JPG/JPEG फॉर्मेट 100 DPI आणि फाईलचा आकार 20 ते 30 केबीच्या दरम्यान असावा.
पश्चिम रेल्वे निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड 10 वी आणि ITI मिळून एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल. निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती सविस्तर मुळ जाहिरातीमध्ये प्राप्त होईल.खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटच्या लिंक वरून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.(उर्वरित माहिती अपडेट केली जाईल)
Western Railway Recruitment Notification 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात : 23 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची सुरुवात होईल.
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 22 ऑक्टोबर 2024 शेवटची तारीख असणार आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहे.
मूळ जाहिरात (शॉर्ट नोटिस) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |