Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 : नागपूर महानगरपालिका यांच्या अंतर्गत (ब्रीडिंग चेकर्स) रिक्त पदांच्या एकूण 38 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या पदांसाठी उमेदवार किमान 10वी, 12वी पदवीधर पाहिजे उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे.नागपूर महानगरपालिका भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे नमूना अर्ज खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2024 आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान, महानगरपालिका द्वारे भरती जाहिरात प्रसारित केली गेली आहे अर्ज करण्या अगोदर खाली दिलेल्या लिंकद्वारे सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
नागपूर महानगरपालिका अर्ज शुल्क
नागपूर महानगरपालिका भरती अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकरण्यात आलेले नाही त्यामुळे अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
नागपूर महानगरपालिका वयोमर्यादा
नागपूर महानगरपालिका मध्ये 18 ते 43 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
नागपूर महानगरपालिका शैक्षणिक पात्रता
नागपूर महानगरपालिका अंतर्गत एकूण 38 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित झाली आहे पदांचे नाव ब्रीडिंग चेकर्स असे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे.
नागपूर महानगरपालिका अर्ज प्रक्रिया
नागपूर महानगरपालिका भरती मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे मुलाखतीसाठी मूळ जाहिरातीत नमूद असलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.मुलाखतीमध्ये उपस्थित राहताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे सर्व वर्षांचे उत्तीर्ण गुणपत्रिका, वयाचा पुरावा, अनुभव प्रमाणपत्र असल्यास, वैद्यकीय परिषद नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड पासपोर्ट आकारातील फोटो, आणि इतर आवश्यक सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रत व छायांकित प्रती सोबत ठेवणे आवश्यक आहे.
नागपूर महानगरपालिका निवड प्रक्रिया
ब्रीडिंग चेकर्स या पदांसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.उमेदवारांची थेट निवड झाल्यावर त्यांना
उमेदवारांची नेमणूक ही अल्प कालावधीसाठी आहे त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेसह कोणताही संबंध राहणार नाही किंवा त्याबाबत उमेदवारांना कोणताही दावा करता येणार नाही असे हमीपत्र निवड झाल्यानंतर उमेदवारांना दिलेल्या मुदतीत रुपये 100/-रु. बॉण्ड पेपरवर नोटरी करून द्यावे लागेल. या कर्मचाऱ्यांना महिन्यातील किमान 25 दिवस नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात काम करणे आवश्यक असणार आहे.
नागपूर महानगरपालिका वेतन
महिनाभरात किमान 25 दिवस नेमणूक केलेल्या क्षेत्रामद्धे काम करावे लागेल दिलेल्या ठिकाणावर काम करावे लागेल. उमेदवारांना प्रतीदिवस 450/- रु. प्रमाणे काम केलेल्या दिवसांचे मानधन राहणार आहे म्हणजेच 25×450 रु.11250/- रु.30 दिवसांसाठी.
अटी
सदरील पदांसाठी उमेदवारांची नेमणूक ब्रीडिंग चेकर्स या पदांसाठी अल्प स्वरूपात म्हणजे 2 महिन्यांसाठी करण्यात येणार आहे.त्यासाठी भरती मध्ये पात्र ठरण्यासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यापेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता असल्यास ते सर्व शैक्षणिक कागदपत्रे जोडावी.
कामाचे स्वरूप
प्रतिदिवस 250 घरांचा एडिस डास अळी करिता सर्वेक्षण करणे आणि तसेच आवश्यकतेप्रमाणे कीटकनाशक औषधींचा वापर करून दास उत्पत्ती थांबवणे अशी कार्यवाही करून कामाचा दैनंदिन अहवाल विहित नमुन्यात त्यांच्या पर्यवेक्षकाकडे हजर करावा लागेल.
Nagpur Mahanagarpalika Bharti Vacancy Details 2024
मुलाखतीमद्धे हजर राहण्याची तारीख : 13 ऑगस्ट 2024 या तारखेला उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज या भरतीसाठी स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि दिलेल्या तारखेस मुलाखतीकरिता हजर राहावे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |