Mastercard Pune Bharti 2024 : मास्टरकार्ड पुणे येथे 6 हजार पदांसाठी नोकरी,जगातील सर्वात मोठे तंत्रज्ञान केंद्र!!

Mastercard Pune Bharti 2024

Mastercard Pune Bharti 2024 : मास्टर कार्ड कंपनीने पुण्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र (MasterCard Pune Jobs) सुरू केले आहे. कंपनीच्या वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासात हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या ठिकाणी सहा हजार तंत्रज्ञ आणि अभियान ते कार्यरत असल्यामुळे हे मास्तर कार्ड चे जगातील सर्वात मोठे तंत्रज्ञान केंद्र ठरले आहे. पुणे येथे तंत्रज्ञान केंद्रात मास्टर कार्ड चे कर्मचारी जगासमोरील गुंतागुंतीच्या तांत्रिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहकार्य करत असतात. त्यामुळे सुरक्षित अखंड आणि कार्यक्षम व्यवहारांकरिता महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची विश्वसनीयता निश्चित होते. नवीन सुविधाची उद्दिष्ट मास्टर कार्डचा जागतिक समूह आणि भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील परिसंस्था यांच्यातील सहकार्य वाढविण्याचे असल्याचे कंपनीने म्हणले आहे.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
Mastercard Pune Recruitment

मास्टर कार्ड चे अध्यक्ष व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी ऍड मॅकलॉघ्लीन यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन मंगळवारी झाले. त्यावेळेस बोलताना ऍड मॅकलॉघ्लीन म्हणाले की, मास्टर कार्ड च्या जागतिक तंत्रज्ञान धोरणात पुण्यातील केंद्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल. आमच्या जगभरातील तंत्रज्ञान विभागात हा महत्त्वाचा दुवा असेल एकेंद्र इतर तंत्रज्ञान केंद्रासोबत जगाला आकार देणारी आणि अर्थव्यवस्थांना भक्कम करणारी क्रांतीकारी तंत्रज्ञानाची उभारणी करेल.

त्या केंद्रात सॉफ्टवेअर विकासापासून, विदा,वित्त संरचना आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील तंत्रज्ञ कार्यरत असतील. सध्या मास्टर कार्ड ची पुण्यासह अर्लींगटन, न्यूयॉर्क, डब्लिन, सेंट लुईस, सिडनी येथे तंत्रज्ञान केंद्र आहेत. पेमेंट सुरक्षा सायबर सुरक्षा फसवणुकीचा शोध आणि डिजिटल ओळख या माध्यमातून मास्टर कार्ड च्या जागतिक सेवेत योगदान ठरेल.

त्याचबरोबर भारतात वित्तीय समावेशनासाठी चा कम्युनिटी पास मंच आणि पेमेंट पास सेवेची सुरुवात करण्यात हे केंद्र भूमिका बजावेल. त्यावेळी बोलताना मास्टर कार्ड चे दक्षिण आशिया अध्यक्ष गौतम अग्रवाल म्हणाले की, भारत देश मास्टर कार्ड साठी अतिशय महत्त्वाचा आहे, डिजिटल अर्थव्यवस्थेला संपूर्ण खंडात कार्यान्वित करण्यास मदत करणाऱ्या तंत्रज्ञानाची भारतात गुंतवणूक केली आहे. पुण्यातील आमचे नवीन तंत्रज्ञान केंद्र हे एक महत्त्वाचा भाग आहे.

भारतातील आमचे कर्मचारी जागतिक तांत्रिक प्रगतीला पाठबळ देणारे आहेत. त्याचबरोबर भारत सरकारची महत्वकांक्षी डिजिटायझेशन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही आमच्या भागीदारांसह काम करण्यास उत्सुक आहोत.

पूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता खालील सविस्तर जाहिरात वाचावी.

सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉