Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 : महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका गट -क संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक असलेल्या फक्त महिला उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे मुख्य सेविका/पर्यवेक्षिका गट-क असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या दिनांक, वेतनश्रेणी बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. महिला व बालविकास विभाग भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा व नोकरी मिळवावी. करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे.अधिक महितीसाठी खालील दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.सरकारी व खाजगी नोकरीविषयक माहिती बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.
महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती वयोमर्यादा
महिला व बालविकास विभाग भरती मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा 21 वर्षे ते 38 वर्षे दिलेली आहे व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता 21 ते 43 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.
महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती अर्ज शुल्क
महिला बाल विकास विभाग मध्ये भरती अर्ज करण्याचे सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क रु.1000/- लागणार आहे व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना रु.900/- अर्ज शुल्क लागणार आहे.
महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती शैक्षणिक पात्रता
महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका गट -क संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील एकूण 102 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव मुख्य सेविका/पर्यवेक्षिका गट-क हे आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवीधर असणे आवश्यक आहे.संपूर्ण माहिती बघण्यासाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात पहावी.
महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती अर्ज प्रक्रिया
महिला बालविकास विभाग मध्ये भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक कागदपत्रे व इतर प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे अर्ज करताना अर्जातील माहिती अचूक भरावी.
दिलेले विहित अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती मासिक वेतन
महिला बालविकास विभाग मध्ये मुख्य सेविका/पर्यवेक्षिका गट-क पदासाठी नियुक्त केलेल्या उमेदवारांसाठी मासिक वेतन एस -13. 35400 – 112400 दिले जाणार आहे.
महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती निवड प्रक्रिया
महिला व बालविकास विभाग भरती मध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांची संगणका आधारित परीक्षा घेतली जाईल निवड प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीत नमूद आहे अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी.
WCD Maharashtra Bharti Vacancy Details 2024
ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 14 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे. या तारखेच्या आत अर्ज सादर करावे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |