IDBI Bank Bharti 2024 : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) मध्ये रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे, रिक्त जागांसाठी पदांचे नाव कार्यकारी (विक्री आणि संचालन) आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा,अर्जाचे शुल्क इतर आवश्यक माहिती खालील जाहिरातीत काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता. IDBI बँक भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे, ऑनलाइन अर्ज ची सुरुवात सात नोव्हेंबर 2024 पासून होणार आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 दिलेली आहे. अशाच नोकरीच्या विविध अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.
IDBI बँक भरती अर्ज शुल्क
आयडीबीआय बँक भरती मध्ये अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क रु.1050/- आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी /एसटी रू.250/- अर्ज शुल्क लागणार आहे.
IDBI बँक भरती वयोमर्यादा
IDBI बँक भरतीमध्ये वयोमर्यादा 20 ते 25 वर्षे दिलेली आहे. राखीव प्रवर्गाचे उमेदवार एससी/ एसटी यांना वयोमर्यादित 05 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादेत सूट देण्यात आलेली आहे. वयोमर्यादेच्या पूर्ण माहितीसाठी मुळ जाहिरात बघावी.
IDBI बँक भरती शैक्षणिक पात्रता
आयडीबीआय बँक अंतर्गत पदांच्या एकूण 1000 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव कार्यकारी (विक्री आणि संचालन) हे आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर, आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता व इतर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
IDBI बँक भरती अर्ज प्रक्रिया
IDBI बँक भरती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 07 नोव्हेंबर 2024 ते 16 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या सूचनानुसार पूर्ण करता येईल.
अर्ज फक्त ऑनलाईनच स्वीकारण्यात येणार आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर असावा जो संपूर्ण निवड प्रक्रियेपर्यंत सुरू राहील. बँक कॉल लेटर किंवा अन्य महत्वाची माहिती या माध्यमातून पाठवेल.
तसेच अर्ज करण्या आधी स्कॅन केलेली फोटो, अंगठ्याचा ठसा, अर्जदाराची सही आणि हस्तलिखित घोषणापत्र तयार ठेवावे.
अर्जातील माहिती काळजीपूर्वक भरणे.
अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती उदाहरणार्थ नाव,जन्मतारीख,संपर्क तपशील, परीक्षा केंद्र इ. माहिती अंतिम मानली जाईल अर्ज सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
अर्ज सबमिट केल्यावर कॅटेगरीमध्ये बदल होणार नाही जर, चुकीच्या कॅटेगिरीत अर्ज केला तर त्यांचा अर्ज रद्द केला जाईल.
अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया :
त्याच्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि recruitment of executives operations and sales (ESO) लिंक वर क्लिक करा आणि apply online या पर्यायावर क्लिक करा. Click here for new registration हे टॅब वर क्लिक करून माहिती भरून रजिस्ट्रेशन करा.
अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर अर्जाची फी भरणे आवश्यक आहे.
अर्जाचे शुल्क डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग IMPS मोबाईल वॉलेट द्वारे भरता येईल अर्ज शुल्क भरल्यावर एक इलेक्ट्रॉनिक पावती जनरेट होईल हे सुरक्षित असल्याची खात्री करा आणि पेमेंट पूर्ण झाल्यावर रिफ्रेश किंवा बॅक बटन वापरू नका पेमेंट प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचणी आल्यास तुम्ही पुन्हा पेमेंट करू शकता.
अर्ज भरल्यानंतर पेमेंट केले जाईल पेमेंट नंतर अर्जाची पीडीएफ प्रिंट करून ठेवा अर्जाची हार्ड कॉपी बँकेला पाठवण्याची आवश्यकता नाही.
IDBI बँक भरती मासिक वेतन
- 1 ले वर्ष रु दरमहा रु.29.000/- वेतन दिले जाणार आहे
- 2 रे वर्ष रु दरमहा रु. 31,000/- वेतन दिले जाणार आहे.
IDBI बँक भरती निवड प्रक्रिया
IDBI बँक भरती निवड प्रक्रियामध्ये खालील टप्प्यांचा समावेश असेल.
- ऑनलाईन परीक्षा
- कागदपत्रे पडताळणी
- वैयक्तिक मुलाखत
- पूर्व भरती वैद्यकीय चाचणी
हे सर्व टप्पे पार केल्यानंतर अंतिम निवड केली जाते.
IDBI Executive Bharti Vacancy Details 2024
अर्ज ऑनलाईन सुरुवात होण्याची तारीख : 07 नोव्हेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्जाची लिंक सुरू होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल दिलेल्या मुदतीत इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |