Chandrapur DCC Bank Bharti 2024 : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव लिपिक व शिपाई असे आहे पदांसाठी ऑनलाइन परीक्षा प्रक्रियेतून सरळ सेवा भरती करण्यात येणार आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रतेची आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 19 ऑक्टोबर 2024 06 नोव्हेंबर 2024 असणार आहे.जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये (Permanent) कायमस्वरूपी नोकरीची उमेदवारांना चांगली संधी आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा व बँकेत नोकरी मिळवावी.अशाच भरतीच्या माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्ज शुल्क
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरती अर्जाचे शुल्क 560/-रुपये भरायचे आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती वयोमर्यादा
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीची वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती शैक्षणिक पात्रता
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर या बँक अंतर्गत एकूण 358 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. यामध्ये 261 लिपिक आणि शिपाई पदांच्या 97 जागा या पदांसाठी ऑनलाइन अर्ज (form) www.cdccbank.co.in या संकेतस्थळावर दिनांक 08 ऑक्टोबर 2024 सकाळी 11.00 ते दिनांक 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत उपलब्ध असणार आहे.सदरील पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांनुसार खालील टेबल मध्ये बघून पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि MSCIT किंवा समकक्ष परीक्षा पास असणे आवश्यक आहे. |
शिपाई | 10वी पास असणे आवश्यक |
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती अर्ज प्रक्रिया
वरील पदांसाठी अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या. ऑनलाईन अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना : उमेदवारांनी अर्जाचे शुल्क भरण्याची प्रत आणि परीक्षा शुल्क भरण्याची पावती सांभाळून ठेवावी.
उमेदवारांना परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज करताना शैक्षणिक पात्रता ईमेल आयडी मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक अचूक भरायचा आहे.
पदासाठी आवश्यक असलेली पात्रता खात्री करूनच अर्ज करावा.
पदांसाठी फक्त वेबसाईट द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज परीक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाईल इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज अपात्र ठरेल.
अर्जदारांनी नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षा पावती किंवा इतर कोणत्याही झेरॉक्स प्रति पाठवू नये.
परीक्षा शुल्क हे विनापरतावा आहे उमेदवारांनी भरलेल्या अर्ज शुल्क परत मिळणार नाही.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती निवड प्रक्रिया
District Central co Operative Bank Bharti Vacancy Details
ऑनलाईन अर्जाची लिंक सुरुवात होण्याची तारीख : 08 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू.
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2024 06 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येईल दिलेल्या मुदतीत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे.
ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख : बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
ऑनलाईन परीक्षा दिनांक : वेबसाइटवर प्रसारित केले जाईल.
कागदपत्रे व मुलाखत तारीख : ऑनलाईन परीक्षेच्या निकालानंतर अधिकृत वेबसाइटवर प्रदर्शित होईल.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे अर्ज करा |