Anganwadi Bharti 2024 : महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग नुसार एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प अधिकारी नागरी जिल्ह्यात प्रकल्पांतर्गत रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. जाहिराती अंतर्गत अंगणवाडी मदतनीस यांची पदे सरळ नियुक्तीने भरण्याकरिता पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करू शकतात. 12 वी उत्तीर्ण उमेदवारांनी या संधीचा संपूर्णपणे लाभ करून घ्यावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे या भरती संदर्भातील संपूर्ण जाहिरात खाली दिलेली आहे.
अंगणवाडी भरती अर्ज शुल्क
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर येथे अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले गेलेले नाही अर्ज निशुल्क आहेत.
अंगणवाडी भरती 2024 वयोमर्यादा
अंगणवाडी भरती अर्ज करणार्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षे असावे.
अंगणवाडी भरती शैक्षणिक पात्रता
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जिल्हा अहमदनगर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जिल्हा अहमदनगर येते अंगणवाडी मदतनीस यांची पदे स्थानिक रहिवासी महिला उमेदवारांकडून एकूण 32 रिक्त जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीचे नोकरी ठिकाण जि. अहमदनगर. (पारनेर) आहे.
अंगणवाडी भरती अर्ज प्रक्रिया
अहमदनगर अंगणवाडी भरती 2024 अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दिलेल्या खालील पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे व अर्जासोबत पासपोर्ट आकारातील फोटो जोडणे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : खालील सविस्तर मूळ जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर.
अंगणवाडी भरती निवड प्रक्रिया
दिलेल्या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज स्वीकार केले जाईल अर्ज प्राथमिक यादी तयार करून छाननी केली जाईल गुणवत्ता पडताळणी समितीकडून मान्यता घेऊन नोटीस बोर्डावर यादी प्रसिद्ध केली जाईल अंतिम यादीमधील भरावयाच्या पदासाठी गुणाक्रमांकानुसार उमेदवारांची निवड करून नियुक्तीपत्र दिले जाईल.
Anganwadi Bhart Vacancy Details 2024
अर्ज ऑफलाईन पद्धतीने सुरुवात होण्याची तारीख : 25 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2024 आहे या तारखेच्या अगोदर लवकरात लवकर अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |