Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 : दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कला शिक्षक, विशेष शिक्षक,वाचा उपचार तज्ञ, मा.वैद्यकीय अधिकारी, वस्तीगृह अधीक्षक, राखणदार, सफाईगार असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे दिव्यांग कल्याण विभाग भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्थ करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे. सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अशाच अपडेट बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
दिव्यांग कल्याण विभाग अर्ज शुल्क
दिव्यांग कल्याण विभाग भरती अर्ज करण्याची उमेदवारांना कोणतीही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही अर्ज निशुल्क आहे.
दिव्यांग कल्याण विभाग वयोमर्यादा
दिव्यांग कल्याण विभाग मध्ये भरती होण्यासाठी कोणत्याही वयोमर्यादेची अट दिलेली नाही.
दिव्यांग कल्याण विभाग शैक्षणिक पात्रता
दिव्यांग कल्याण विभाग मध्ये विविध रिक्त एकूण 17 पदांसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांची नावे कला शिक्षक, विशेष शिक्षक,वाचा उपचार तज्ञ, मा.वैद्यकीय अधिकारी, वस्तीगृह अधीक्षक, राखणदार, सफाईगार असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता चौथी ते पदवीधर आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिरातीसमोरील लिंक वर क्लिक करून व जाहिरातींमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती बघून घ्यायची आहे आणि पदासाठी अर्ज करायचे आहे.
दिव्यांग कल्याण विभाग वेतनश्रेणी
दिव्यांग कल्याण विभाग वेतन माहिती पदांनुसार आहे वेतनश्रेणीची माहिती दिलेल्या मूळ जाहिरातीमद्धे नमूद आहे मूळ जाहिरात बघून वेतनश्रेणीची माहिती पहायची आहे.
दिव्यांग कल्याण विभाग अर्ज प्रक्रिया
दिव्यांग कल्याण विभाग मध्ये वरील पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज दिलेल्या खालील पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर पोस्टाद्वारे पाठवायचा आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी स्वहस्त अक्षरातील अर्जासोबत उमेदवारांनी ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, पासपोर्ट आकारातील फोटो जोडायचा आहे.अर्जामध्ये संबंधित अर्जदाराचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी नमूद करावा.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : मूकबधिर व अपंग निवासी विद्यालय, तुळजापूर, मंगरूळपीर, तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम – 444403 या पत्त्यावर अर्ज पोस्टाने किंवा स्वतः हजर राहून सादर करायचे आहे.
दिव्यांग कल्याण विभाग निवड प्रक्रिया
उमेदवारांकडून पात्र झालेल्या अर्जांची छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचलित नियमाप्रमाणे पात्र उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे निवड प्रक्रिया बाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवड समितीचा राहील. अधिक माहितीसाठी दिलेली मूळ जाहिरात वाचू शकता.
Divyang Kalyan Vibhag Bharti Vacancy Details
अर्ज सुरुवात होण्याची सुरुवात : पदांची भरती ऑफलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : (15 दिवस ) 01 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहे. या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व अर्ज दिलेल्या तारखेच्या आत सादर करायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : मूकबधिर व अपंग निवासी विद्यालय, तुळजापूर, मंगरूळपीर, तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम – 444403
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |