SBI Clerk Bharti 2024 : बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असणार्या उमेदवारांसाठी ही अत्यंत चांगली सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लिपिक (कनिष्ठ सहकारी) असे आहे. या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाचे शुल्क,अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा याबद्दल अधिक माहिती खालील जाहिरातीत दिलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक भरती अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत SBI भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे. नोकरीविषयक विविध अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती अर्ज शुल्क
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये सर्वसाधारण/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी रु.750/- आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी यांना अर्ज शुल्क लागणार नाही.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा
स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक भरती वयोमर्यादा 01.04.2024 रोजी उमेदवाराचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे प्रवर्गनिहाय वयोमर्यादामध्ये खालील प्रमाणे सूट आहे.
- एससी/एसटी 33 वर्षे
- अपंग उमेदवार (सामान्य) 38 वर्षे
- ओबीसी : 31 वर्षे
- अपंग व्यक्ति एससी/एसटी : 43 वर्षे
- अपंग व्यक्ति (ओबीसी) : 41 वर्षे
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांच्या तब्बल 13,735 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव हे लिपिक (कनिष्ठ सहकारी) आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.शैक्षणिक पात्रता व पदांचा सविस्तर तपशील व इतर अधिक माहितीसाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती अर्ज प्रक्रिया
SBI ज्युनियर असोसिएट भरती 2024 साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच करावा, इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्जदारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा www.sbi.co.in/web/careers/current-openings
आणि junior associates 2024 recruitment लिंक ओपन करावी.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे वैध मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असावा.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करावी आपला पासपोर्ट आकारातील फोटो, सही, डाव्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र आणि एसबीआय अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अर्ज व्यवस्थितरित्या भरावा अंतिम सबमिट नंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत.
ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्यानंतर अर्जाचे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग द्वारे भरावे.
ऑनलाइन व्यवहारानंतर अर्ज शुल्क भरल्याची पावती आणि अर्ज फॉर्म डाऊनलोड करून प्रिंट करून ठेवावा.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती निवड प्रक्रिया
SBI जुनियर असोसिएट 2024 निवड प्रक्रिया विविध टप्प्याद्वारे केली जाईल टप्पा I: प्रिलिमिनरी परीक्षा (100 गुण, 1 तास) टप्पा II: मुख्य परीक्षा (200 गुण, 2 तास 40 मिनिटे) अर्जातील माहिती व पात्रतेची पडताळणी निवड यादी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती बघण्यासाठी खालील दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.
SBI Clerk Recruitment Important Dates
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 17 डिसेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2025 आहे दिलेल्या मुदतीतच अर्ज स्वीकारण्यात येईल पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |