Satara DCC Bank Bharti 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मध्ये एकूण 323 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या भरती अंतर्गत कनिष्ठ लिपिक,कनिष्ठ शिपाई पदांची भरती केली जाणार आहे पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्जाचे शुल्क महत्त्वाच्या तारीख इत्यादी माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क व नोकरीचे ठिकाण अर्ज करण्यासाठी प्रक्रिया या सर्व गोष्टी बाबत माहिती खाली दिलेल्या जाहिरातीत काळजीपूर्वक वाचावी आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करावे.सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा संपूर्ण पणे लाभ घ्यावा व बँकेत नोकरी मिळवावी.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती अर्ज शुल्क
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये खुला प्रवर्गाच्या उमेदवारांना रु 500/-+90 GST सह रु. 590/- अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.(परीक्षा शुल्क रक्कम फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरावी लागेल)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती वयोमर्यादा
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कनिष्ठ शिपाई या पदासाठी 18 ते 38 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे. आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी 21 ते 38 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती शैक्षणिक पात्रता
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 323 रिक्त जागा भरण्याची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे या रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ लिपिक,कनिष्ठ शिपाई असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पाहून शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करावा. (सविस्तर महितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ लिपिक | उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणिMSCIT किंवा समकक्ष परीक्षा पासअसणे आवश्यक आहे. वाणिज्य शाखेतील पदवीधर/पदव्युत्तर पदवी आणि बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतून कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य त्याचप्रमाणे इंग्रजी मराठी टायपिंग लघुलेखन परीक्षा पास असल्यास प्राधान्य. |
कनिष्ठ शिपाई | मान्यताप्राप्त कोणत्याही बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि इंग्रजी व संगणकाचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे |
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती अर्ज प्रक्रिया
खाली दिलेल्या लिंक द्वारे थेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल अर्ज करताना लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रता आवश्यक प्रमाणपत्र अपलोड करा अर्जातील संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे अपूर्ण अर्ज असल्यास अपात्र ठरविण्यात येईल अर्ज शुल्क न भरल्यास अर्ज पूर्णपणे सबमिट होणार नाही अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधार नंबर अचूक भरणे आवश्यक आहे..अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती निवड प्रक्रिया
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Satara DCC Bank भरती उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल परीक्षेची माहिती ईमेल SMS द्वारे कळविली जाणार आहे अर्ज करताना संपर्क तपशील अचूक भरावा.कागदपत्रे पडताळणी व मुलाखत घेतली जाईल.अंतिम उमेदवारांची निवडू सूची तयार करण्यात येईल. (निवड प्रक्रियेबद्दल पूर्ण माहिती मूळ जाहिरातीत नमूद आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी)
Satara DCC Bank Bharti Vacancy Details 2024
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची सुरुवात : 12 ऑगस्ट 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 ऑगस्ट 2024 आहे या तारखे पर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज ऑनलाइन सादर करायचे आहे.
Satara DCC Bank Bharti Notification 2024
ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क होण्याची तारीख- 12 ऑगस्ट 2024 पासून ते 21 ऑगस्ट 2024 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.
ऑनलाइन परीक्षेची तारीख – बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अपडेट केली जाईल.
ऑनलाइन परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची तारीख-बँकेच्या वेबसाईटवर अद्यावत केली जाईल.
कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीची तारीख-बँकेच्या मुख्य वेबसाईटवर अपडेट प्रकाशित केला जाईल.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |