Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकारी या पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 246 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. पदांसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.
246 रिक्त पदांची शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे शैक्षणिक पात्रता विषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराती समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे. आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदाकरिता अर्ज करायचा आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारे उमेदवाराकडून अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत काम करण्याची उमेदवारांना ही चांगली संधी प्राप्त झाली आहे या संधीचा उमेदवार यांनी संपूर्णपणे लाभ घ्यावा व चांगली नोकरी मिळवावी. भरती बद्दल रोज नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या www.mahasarkarnaukri.in या वेबसाईटला भेट द्या.
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 Details
पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. पदांकरिता इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती वयोमर्यादा
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयाची कोणतीही अट दिलेली नाही पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात वयोमर्यादेबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात वाचायची आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अर्ज शुल्क
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीमध्ये अर्ज करण्याकरिता कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही,अर्ज शुल्काबद्द्ल माहिती मूळ जाहिरातीमध्ये नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता लागणार नाही (अर्ज शुल्कविषयी संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात वाचायची आहे.)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता
246 रिक्त जागा भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकारी असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये आहे शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता सविस्तर जाहिरात समोर दिलेल्या लिंकवरून वाचून घायची आहे.
पदांची नावे | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | एमबीबीएस/बीएएमएस |
स्टाफ नर्स | 12 वी पास,जीएनएम/बी.एस.सी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी आवश्यक |
बहुउद्देशीय आरोग्य सेवक | 12 वी विज्ञान शाखेतून पास व पॅरामेडीकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्सपेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मासिक वेतन
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार खालील प्रमाणे वेतन दिले जाणार आहे दिलेल्या टेबल मध्ये माहिती पहावी वेतन माहितीबद्दल संपूर्ण जाणून घेण्यासाठी सविस्तर जाहिरात समोर दिलेल्या लिंकवरून (मूळ जाहिरात वाचायची आहे)
पदांची नावे | पदांसाठी वेतन |
वैद्यकीय अधिकारी | प्रतिमहा रु. 60,000/- |
स्टाफ नर्स | प्रतिमहा रु. 20,000/- |
बहुउद्देशीय आरोग्य सेवक | प्रतिमहा रु. 18,000/- |
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती अर्ज प्रक्रिया
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 जून 2024 आहे. या तारखेच्या पलीकडील कोणत्याही प्रकारची ऑफलाइन पद्धतीने अर्ज या भरती करिता स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. व दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर आपले अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे व आपल्या पदाकरिता अर्ज करायचा आहे आणि दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज करण्यासाठी पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष. या ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 : 00 ते सायंकाळी 05 : 00 या वेळेत अर्ज दिलेल्या मुदतीत समक्ष जाऊन हजर करायचा आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवड प्रक्रिया
चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीत दिली गेलेली नाही निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती उमेदवारांना या भरतीसाठी व पदासाठीअर्ज केल्यानंतर त्यांच्या संपर्क तपशिल वर कदाचित दिले जाणार निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसमोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचायची आहे.