NUHM Vasai Virar Bharti 2024 : वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यात यावी या करिता जाहिरात प्रसारीत करण्यात आली आहे. या रिक्त पदांच्या जाहिरातींनुसार M.B.B.S संवर्गातील पदे, बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (MD) एपिडेमियोलॉजिस्ट,वैद्यकीय अधिकारी,बालरोगतज्ञ,स्टाफ नर्स, बहूउद्देशीय आरोग्य सेवक ही पदे मुलाखतीद्वारे रली जाणार आहेत.यासाठी 24 जुलै 2024 या रोजी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण महितीसाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसामोरील लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत नोकरी करण्याची उमेदवारांना चांगली संधी आहे या संधीचा उमेदवारांनी संपूर्णपणे लाभ घ्यावा व नोकरी मिळवावी. पदांचा अर्ज 24 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 या तारखेला करावे. भरती अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
वसई विरार महानगरपालिका भरती वयोमार्यादा
एपिडेमियोलॉजिस्ट,वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ,मायक्रोबायोलॉजिस्ट, (MD) या पदांसाठी वयोमार्यादा 70 वर्ष दिलेली आहे.
स्टाफ नर्स, बहुउद्देशीय, आरोग्य सेवक पदांसाठी – 65 वर्षे वयोमर्यादा आहे
वसई विरार महानगरपालिका भरती अर्ज शुल्क
वसई विरार महानगरपालिका भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
वसई विरार महानगरपालिका भरती रिक्त पदे
पदांचे नाव | रिक्त जागा |
बहुउद्देशिय आरोग्य सेवक | 56 |
वैद्यकीय अधिकारी | 91 |
बालरोगतज्ञ | 02 |
एपिडेमियोलॉजिस्ट | 01 |
स्टाफ नर्स | 48 |
वसई विरार महानगरपालिका भरती शैक्षणीक पात्रता
वसई विरार शहर महानगरपालिका पालघर मध्ये एकूण 198 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे पदांचे नाव हे M.B.B.S संवर्गातील पदे, बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (MD) एपिडेमियोलॉजिस्ट,वैद्यकीय अधिकारी,बालरोगतज्ञ,स्टाफ नर्स, बहूउद्देशीय आरोग्य सेवक असे आहे.या पदांची आवश्यक शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे. खालील टेबल मध्ये शैक्षणिक पात्रता पाहून पदासाठी अर्ज करावा (शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
बहुउद्देशिय आरोग्य सेवक | 12 वी विज्ञान शाखेतून पास असणे आवश्यक पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पास असणे आवश्यक आहे. बहुउद्देशिय कामातील अनुभव असणार्या उमेदवारांना प्राधान्य असेल. |
वैद्यकीय अधिकारी | MCI reg./MMC/reg.MBBS |
बालरोगतज्ञ | MD/Paed/DNB/DCH |
एपिडेमियोलॉजिस्ट | MPH/MBA/MHA असलेले वैद्यकीय पदवीधर |
स्टाफ नर्स | GNM/BSC नर्सिंग |
वसई विरार महानगरपालिका भरती अर्ज प्रक्रिया
फार्मासिस्ट व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्या आधी उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : – बहुउद्देशीय इमारत,प्रभाग समिति सी कार्यालय, 4था मजला,विरार (पू) या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
वसई विरार महानगरपालिका भरती निवड प्रक्रिया
बालरोगतज्ञ,वैद्यकीय अधिकारी एपिडेमियोलॉजिस्ट पदांसाठी मुलाखती आयोजित केलेल्या आहेत या पदांकरिता खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी 24 जुलै 2024 रोजी हजर राहायचे आहे.
मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिका,मुख्य कार्यालय,सामान्य परिषद कक्ष,ए विंग 7 वा मजला,यशवंत नगर,विरार, (प.)
NUHM Vasai Virar Bharti Vacancy Details 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |