Indian Coast Guard Bharti 2024 : शेवट तारीख- 10 वी 12 वी पदवीधरांना भारतीय तटरक्षक दलात नोकरीची उत्तम संधी!

Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसारित झाली आहे. भारतीय तटरक्षक दल मध्ये नाविक (सामन्य कर्तव्य) आणि यांत्रिक या पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 320 पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे 320 रिक्त पदांच्या भरतीची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेप्रमाणे दिली गेली आहे.

शैक्षणिक पात्रता माहिती संपूर्ण बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचा आहे. (मूळ जाहिरात पहा) भारतीय तटरक्षक दल मध्ये भरती होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कण्याची शेवटची तारीख ही 03 जुलै 2024 आहे.या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारच्या अर्जांचा स्वीकार केला जाणार नाही. दिलेल्या तारखेच्या आधी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहे. भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा व संरक्षण मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या इंडियन कोस्ट गार्ड मध्ये नोकरी मिळवावी. भरती विषयक रोज नवनवीन अपडेट साठी आमच्या www.mahasarkarnaukri.in या वेबसाईट ला भेट द्या.

Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024 Details

इंडियन कोस्ट गार्ड भरती पदांच्या जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती अंतर्गत नाविक (सामन्य कर्तव्य) आणि यांत्रिक या पदांच्या रिक्त जागा भरायच्या आहेत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 13 जून 2024 या तारखेपासून सुरु होणार आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

भारतीय तटरक्षक दल भरती वयोमर्यादा

भारतीय तटरक्षक दल भरती अर्ज करण्याची वयोमर्यादा 18 ते 22 वर्ष आहे. या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार वयोमर्यादेत एससी/ एसटी यांना पाच वर्ष सूट व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्ष वयोमर्यादित सूट दिलेली आहे.(वयोमर्यादेच्या संपूर्ण माहिती बघण्यासाठी सविस्तर जाहिरात वाचावी)

भारतीय तटरक्षक दल अर्ज शुल्क

भारतीय तटरक्षक दल भरती साठी परीक्षा फी रु. 300/- आहे मागासवर्गीय प्रवर्ग उमेदवार एससी/एसटी यांना ही लागू नाही (अर्ज शुल्काच्या संपूर्ण माहितीसाठी दिलेली खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे)

भारतीय तटरक्षक दल रिक्त पदांची संख्या
पदांचे नाव रिक्त पदांची संख्या
नाविक (सामन्य कर्तव्य)260
यांत्रिक विभाग60
भारतीय तटरक्षक दल भरती शैक्षणिक पात्रता

मध्ये एकूण 320 रिक्त पदांची भरती प्रकाशित करण्यात आली आहे.पदांचे नाव हे नाविक (सामन्य कर्तव्य) आणि यांत्रिक असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे.शैक्षणिक पात्रता माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या टेबल मध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार पहायची आहे व वाचून घ्यायची आहे आणि त्यानुसार अर्ज करायचे आहे.

पदांची नावेआवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता
नाविक (सामन्य कर्तव्य) कौन्सिल ऑफ बोर्ड्स फोर स्कूल एज्युकेशन (CBSE) द्वारे मान्यताप्राप्त मंडळाकडून 12 वी पास (गणित आणि भौतिकशास्त्र)
यांत्रिक10 वी पास + AICTE मंजूर डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन)
भारतीय तटरक्षक दल भरती अर्ज प्रक्रिया

भारतीय तटरक्षक दल मध्ये भरती होण्यासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर आपला अर्ज करायचा आहे शेवटची तारीख ही 3 जुलै 2024 अशी आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज या भरती करिता उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी दिलेल्या लिंक वरून अर्ज पाठवायचे आहे.

या भरतीचा अर्ज करताना उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे व ओळखपुरावा व जात प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्रे अर्ज करताना अपलोड करायची आहेत अर्ज नाकारला जाऊ नये त्यासाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईटभेट द्या
सविस्तर जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज करा
Indian Coast Guard Bharti Notification 2024

अर्ज करण्यासाठी सुरुवात : 13 जून 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2024 आहे या तारखेपूर्वी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर सादर करायचे आहे.

भारतीय तटरक्षक दल भरती निवड प्रक्रिया

भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरी करिता उमेदवारांची निवड ही त्यांच्या गुणवत्तेनुसार
नाविक (जिडी) साठी विभागानुसार व यांत्रिक साठी अखिल भारतीय पातळीवर होते.

उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार निवड केली जाते आणि त्यांची वैद्यकीय परीक्षा पूर्ण करणे आवश्यक आहे.
सर्व उमेदवारांची ओळख तपासणी आवश्यक आहे, जेणेकरून परीक्षेच्या सुरुवातीपूर्वी ओळख पडताळणी केली जाईल.

ओळख तपासणीमध्ये खालील घटकांचा समावेश आहे

नोंदणी दरम्यान प्रत्यक्ष प्रतिमा कॅप्चर-
उमेदवाराला नोंदणी दरम्यान नवीनतम छायाचित्र अपलोड करणे आवश्यक आहे.

नोंदणी दरम्यान उमेदवाराची प्रत्यक्ष प्रतिमा कॅप्चर केली जाईल. अपलोड केलेल्या फोटोतील चेहऱ्याचे वैशिष्ट्यांच्या वास्तविक फोटोशी जुळवले जाईल.
फक्त फोटो जुळल्यानंतरच अर्ज सबमिट होईल.
या व्यतिरिक्त अर्ज फॉर्म मधील उमेदवाराची छायाचित्र पुढील टप्प्यातील चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांसोबत जुळवणी बायोमेट्रिक तपासणी फक्त डाव्या अंगठ्याचे बायोमेट्रिक कॅप्चर केले जाईल. जर डाव्या अंगठ्याच्या बायोमेट्रिक कॅप्चर केले गेले नाही तर उजव्या अंगठ्याची बायोमेट्रिक कॅप्चर केले जाईल. आणि पुढील पडताळणीसाठी वापरले जाईल.

डाव्या आणि उजव्या व इतर कोणत्याही बोटासाठी बायोमेट्रिक स्वीकारले जाणार नाही. बायोमेट्रेशन मशीन मध्ये मेहंदी मोम इत्यादीमुळे बोटाचे छायाचित्र कॅप्चर होऊ शकले नाही तर उमेदवारांना परीक्षेचा बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.

ऑनलाइन अर्ज मध्ये अपलोड केलेली सही

ऑनलाईन अर्ज मध्ये नमूद केलेले ओळख चिन्ह

कोणत्याही टप्प्यात वरील ओळख तपासणीच्या वेळी उमेदवार अपयशी ठरल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.

तटरक्षक दल प्रवेश परीक्षेच्या विविध टप्प्याचे तपशील.
टप्पा-1

१) संगणक आधारित परीक्षा
२) दस्तऐवज पडताळणी

ऑनलाइन अर्जामध्ये भरलेल्या माहितीची पडताळणी केली जाईल उमेदवारांनी खाली दस्तऐवजांची सत्यप्रती आणणे आवश्यक आहे.
वैध ओळखपत्र आधार कार्ड,/ पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र,/ वाहन चालक परवाना किंवा पासपोर्ट रंगीत प्रिंट आऊट ऍडमिट कार्ड पांढऱ्या कागदावर प्रिंट आऊटला परवानगी नाही. पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र एससी/एसटी उमेदवारांसाठी मुळ श्रेणी प्रमाणपत्र स्वयंसाक्षांकित प्रत. मूळ ट्रेन बस तिकीट चेकलीफ आणि प्रवास खर्चासाठी फॉर्म. दस्तऐवज पडताळणी वैध ठरल्यानंतर उमेदवारांची बायोमेट्रिक रेकॉर्डिंग केली जाईल.
लेखी परीक्षा :
नाविक (जीडी) साठी विभाग I + II 50 गुण सर्वसाधारण ईडब्लूएस /ओबीसी साठी आणि एससीएसटी साठी 44 गुण
यांत्रिक विविध शाखा :
I+III/IV/V : 50 गुण सर्वसाधारण ईडब्ल्यूएस/ ओबीसी साठी आणि 44 गुण एससी /एसटी साठी.

टप्पा 2 :
  1. आकलन व अनुकूलता चाचणी
  2. शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT)
  3. दस्तऐवज पडताळणी
  4. iv) भरती वैद्यकीय परीक्षा

अंतिम गुणवत्ता यादी तयार करणे ICG द्वारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल व उमेदवारांच्या गुणांनुसार व रिक्त पदांच्या उपलब्धतेप्रमाणे उमेदवारांची निवड केली जाईल.

टप्पा 3
  1. दस्तऐवज पडताळणी
  2. अंतिम भरती वैद्यकीय चाचणी
  3. मूळ कागदपत्रे सादर करणे पोलीस पडताळणी व इतर संबंधित फॉर्मस.
टप्पा – 4

उमेदवारांचे प्रशिक्षण INS चिल्का येथे होईल व सर्व मूळ कागदपत्र व स्थापन केली जातील उमेदवारांनी या वरील सर्व टप्पे पार केल्यावरच भारतीय तटरक्षक दलात भरतीसाठी निवड केली जाईल.

भारतीय तटरक्षक दल मध्ये भरती होण्यासाठी निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी अर्ज दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे त्यामध्ये सर्व माहिती देण्यात आलेली आहे निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.(वरील माहिती अपूर्ण असू शकते पूर्ण माहितीसाठी वर दिलेल्या सविस्तर जाहिरातीच्या समोर क्लिक करून सविस्तर पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे)

इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉