Canara Bank Bharti 2024 : कॅनरा बँक अंतर्गत एकूण 3000 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव आहे पदवीधर प्रशिक्षणार्थी आहे. या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहितीकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात मध्ये बघायची आहे. कॅनरा बँक भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज लिंक 21 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे.तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे. बँक अंतर्गत नोकरीची पदवीधर उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा.नोकरीच्या अशाच अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
कॅनरा बँक भरती अर्ज शुल्क
कॅनरा बँक भरती अर्ज करण्यासाठी एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेदवार सोडून इतर सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क रु.500/- लागणार आहे.
कॅनरा बँक भरती वयोमर्यादा
कॅनरा बँक भरती मध्ये अराखीव प्रवर्गातील उमेद्वारांकरिता वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे वयोमर्यादा दिली गेली आहे व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे ओबीसी नॉन क्रिमीलेयर प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे आणि पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना वयोमार्यदामध्ये 10 वर्षे सूट आहे
कॅनरा बँक भरती शैक्षणिक पात्रता
कॅनरा बँक मध्ये एकूण 3000 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित केली गेली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे पदवीधर प्रशिक्षणार्थी असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायची आहे. (पूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पदवीधर प्रशिक्षणार्थी | उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅजुएट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
कॅनरा बँक भरती अर्ज प्रक्रिया
कॅनरा बँक भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात 21 सप्टेंबर 2024 पासून होणार आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी लागणारी शैक्षणिक कागदपत्रे प्रमाणपत्रे तयार ठेवावी.
कॅनरा बँक भरती निवड प्रक्रिया
उमेदवारांची कॅनरा बँक मध्ये पदवीधर शिकाऊ उमेदवार नियुक्ती गुणवत्ता यादीद्वारे करण्यात येणार आहे
10वी,12वी डिप्लोमा परीक्षेत मिळालेल्या गुण टक्केवारी बाबतीत एकापेक्षा जास्त उमेदवार समान टक्केवारी असतील अशा उमेदवारांच्या बाबतीत वयानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी केली जाईल.
निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीमद्धे नमूद आहे संपूर्ण महितीकरिता मूळ जाहिरातीमद्धे निवड प्रक्रियेची माहिती बघून घ्यायची आहे.
Canara Bank Bharti Vacancy Details 2024
ऑनलाईन अर्जाची लिंक सुरुवात होण्याची तारीख : 21 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रियेची सुरुवात होणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2024 तारखेनंतर ऑनलाईन अर्जाची लिंक बंद होईल व उमेदवारांचे कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |