Bhandara DCC Bank Bharti 2024 : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या भरती अंतर्गतशिपाई व लिपिक पदांची भरती केली जाणार आहे पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्जाची शुल्क महत्त्वाच्या तारीख इत्यादी माहिती खाली दिलेली आहे. असं करण्यापूर्वी उमेदवारांनी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क व नोकरीचे ठिकाण अर्ज करण्यासाठी प्रक्रिया या सर्व गोष्टी बाबत माहिती खाली दिलेल्या जाहिरातीत काळजीपूर्वक वाचावी आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करावे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा संपूर्ण पणे लाभ घ्यावा व बँकेत नोकरी मिळवावी.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती अर्ज शुल्क
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये खुला प्रवर्गाच्या उमेदवारांना रु 750/-135 GST सह रु. 885/- अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क रु.650 /- 117/- GST सह 767/- रु. अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती वयोमर्यादा
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना लिपिक या पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 21 ते 40 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना वयोमर्यादा 05 वर्ष सूट दिलेली आहे.
शिपाई या पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 40 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे आणि राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना वयोमर्यादेत 05 वर्ष सूट देण्यात आलेली आहे.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 शैक्षणिक पात्रता
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 118 रिक्त जागा भरण्याची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे या रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लिपिक आणि शिपाई असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पाहून शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करावा. (सविस्तर महितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असणे आवश्यक आहे व MSCIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण |
शिपाई | मान्यताप्राप्त कोणत्याही बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक |
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती अर्ज प्रक्रिया
भरती अर्ज खालील लिंकद्वारे थेट ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जं करताना लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करावी. अर्जातील संपूर्ण माहिती भरावी अपूर्ण अर्ज रद्द ठरविला जाईल सोबतच लागणारे आवश्यक अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे अर्ज शुल्क न भरल्यास अर्ज पुर्णपणे सबमीट होणार नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती निवड प्रक्रिया
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक DCC Bank भरती उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल परीक्षेची माहिती ईमेल SMS द्वारे कळविली जाणार आहे अर्ज करताना संपर्क तपशील अचूक भरावा.कागदपत्रे पडताळणी व मुलाखत घेतली जाईल.अंतिम उमेदवारांची निवडू सूची तयार करण्यात येईल. (निवड प्रक्रियेबद्दल पूर्ण माहिती मूळ जाहिरातीत नमूद आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी)
Bhandara DCC Bank Recruitment Notification 2024
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 24 जुलै 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्जास सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024 आहे या तारखेच्या नंतर कोणत्याही उमेदवाराकडुन अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करावे.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज करा |