Janta Sahakari Bank Bharti 2024 : सोलापूर जनता सहकारी बँक बहुराज्यीय अनुसूचित सहकारी बँक महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील कार्यक्षेत्र असणार्या बँक अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव प्रशिक्षणार्थी लिपिक हे आहे या पदाची लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया व इतर अधिक माहिती खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड भरतीचे नोकरी ठिकाण मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, धाराशिव, छ. संभाजीनगर, बीड हे आहे. या भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. नोकरी संदर्भातील माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukari.in
सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड भरती अर्ज शुल्क
सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड भरती अर्ज करण्यासाठी 750/- + 18% GST (एकूण रु.885/-) इतके शुल्क भरावे लागेल.
सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड भरती वयोमर्यादा
सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड भरतीमध्ये सर्वसाधारण उमेदवारांना 35 वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 40 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.
सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता
सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे प्रशिक्षणार्थी लिपिक आहे या पदांसाठी उमेदवार 50 % गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता आणि इतर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.
सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड भरती अर्ज प्रक्रिया
सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड भरतीचे अर्ज खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे.
अर्ज भरताना सर्व आवश्यक माहिती भरावी आणि अर्ज फक्त संगणकीय प्रणाली द्वारे स्वीकारला जाणार आहे. अर्ज भरल्यानंतर संगणकीय प्रणालीकडून एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल. हा क्रमांक परीक्षा शुल्क भरण्यासाठी वापरायचा आहे.
पासपोर्ट फोटो (3.5 सेमी x 4.5 सेमी) फोटो स्कॅन करून नमूद केलेल्या जागेत अपलोड करणे आवश्यक आहे.
सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड भरती निवड प्रक्रिया
उमेदवारांची संगणक आधारित CBT -MCQ प्रकार पद्धतीने परिक्षा घेतली जाईल. परीक्षा सोलापूर येथील विविध केंद्रावर होईल. परीक्षा केंद्राबद्दल वेळ पत्ता उमेदवारांच्या हाल तिकिटावर दिला जाईल.
अंतिम यादी ही परीक्षा गुण, वैयक्तिक मुलाखत, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव यावर आधारित तयार करण्यात येईल. निवड प्रक्रिया बद्दल पूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात बघू शकता.
Janata Sahakari Bank Solapur Recruitment Important Dates
ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 13 डिसेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज पाठवायचे आहेत.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |