Naval Dockyard Mumbai Bharti 2024
Naval Dockyard Mumbai Bharti 2024 : डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबईमध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये वरिष्ठ स्टोअर कीपर, स्टेनोग्राफर ग्रेड II, मल्टीटास्किंग स्टाफ पदाची भरती प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 07 रिक्त पदांसाठी ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.07 रिक्त पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे.
शैक्षणिक पात्रे विषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदाकरीता करिता अर्ज करायचा आहे. नेव्हल डॉकयार्ड मुंबई भारतीय अंतर्गत उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 दिवस म्हणजेच 3 जुलै 2024 आहे. शेवट तारखे नंतर कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन अर्ज या भरती करिता उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व दिलेल्या तारखेच्या आत आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा. नेव्हल डॉकयार्ड मुंबई मध्ये काम करण्याची उमेदवारांना एक चांगली संधी प्राप्त झाली आहे.उमेदवारांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा व सरकारी नोकरी मिळवावी. भरतीच्या नवनवीन अपडेट्स साठी आमच्या वेबसाईट www.mahasarkarnaukri.in ला भेट द्या.
Naval Dockyard Mumbai Bharti Details
वरिष्ठ स्टोअर कीपर, स्टेनोग्राफर ग्रेड II, मल्टीटास्किंग स्टाफ या पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे अर्ज प्रक्रिया ऑफलाईन माध्यामातून आहे भरतीची माहिती खाली दिलेली आहे.
नेव्हल मुंबई डॉकयार्ड भरती वयोमर्यादा
नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी आहे. वरिष्ठ स्टोअर कीपर आणि स्टेनोग्राफर ग्रेड II या पदासाठी उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्ष असावे.
मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष दिली आहे.
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना एससी /एसटी यांना 05 वर्ष वयोमर्यादित सूट दिली गेली आहे व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्ष वयामध्ये सूट दिलेली आहे सरकारी नियमानुसार वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराती समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे व आपल्या वयोमर्यादेप्रमाणे अर्ज करायचा आहे.
नेव्हल मुंबई डॉकयार्ड अर्ज शुल्क
नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती मध्ये अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले गेलेले नाही अर्ज शुल्का विषयी मोळ जाहिरातीमध्ये कोणती माहिती नमूद केलेली नाही त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही (अर्ज शुल्काच्या संपूर्ण माहितीसाठी कृपया दिलेली मूळ जाहिरात पहावी)
नेव्हल मुंबई डॉकयार्ड भरती 2024 शैक्षणिक पात्रता
नेव्हल डॉकयार्ड मुंबई मध्ये एकूण 07 रिक्त पदांसाठी प्रकाशित झालेल्या भरती करिता शैक्षणिक पात्रताही पदा नुसार आहे खाली दिलेल्या टेबल मध्ये माहिती पहावी शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराती समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदाकरिता अर्ज करायचा आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ स्टोअर कीपर | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठामधून 10+2 किंवा समकक्ष उत्तीर्ण उमेदवार. |
स्टेनोग्राफर ग्रेड II | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10 + 2 किंवा समकक्ष उत्तीर्ण |
मल्टीटास्किंग स्टाफ | 10 वी पास उमेदवार |
नेव्हल मुंबई डॉकयार्ड वेतनश्रेणी
नेव्हल मुंबई डॉकयार्ड मुंबई मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल (वेतनश्रेणी बद्दल अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी)
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ स्टोअर कीपर | वेतन श्रेणी – 4 रु.25500-81100 |
स्टेनोग्राफर ग्रेड II | वेतन श्रेणी – 4 रु.25500-81100 |
मल्टीटास्किंग स्टाफ | वेतन श्रेणी – 1 रु. 18000-56900 |
नेव्हल मुंबई डॉकयार्ड अर्ज प्रक्रिया
सदर भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
योग्य प्रकारे पूर्ण भरलेला अर्ज परिशिष्ट A-II च्या नमुन्यानुसार इंग्रजीमध्ये A4 आकारातील कागदावर टाईप केलेला अर्ज व परिशिष्ट AII प्रमाणे प्रवेश पत्राच्या दोन प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे अर्जासोबत अंदाजे 25cm x 10cm आकाराचे एक स्वप्न असलेले लिफाफा जोडणे आवश्यक आहे ज्यामध्ये कॉल लेटर पाठवले जाईल तीन अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो एक अर्जाच्या योग्य बॉक्समध्ये चिकटवलेले आणि इतर दोन स्वतःच्या स्वाक्षरीचे प्रत्येक प्रवेश पत्राच्या योग्य बॉक्समध्ये चिटकवलेले.
पूर्ण केलेला अर्ज दिलेल्या खालील पत्त्यावर पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : मुख्य गुणवत्ता अश्यूरन्स एस्टब्लीषमेंट (नेव्हल स्टोअर्स), DQAN कॉम्प्लेक्स,8 वा मजला,नेव्हल डॉकयार्ड,टायगर गेट मुंबई-400023 या पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा.
अर्ज सुरु होण्याची तारीख : ऑफलाईन अर्ज प्रक्रिया 07 जून 2024 या तारखेपासून सुरु आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे या तारखेनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही अर्जांचा विचार केला जाणार नाही.
Naval Dockyard Mumbai Recruitment Notification
अटी :
SC/ST/OBC प्रमाणपत्राच्या स्वसाक्षांकित प्रति ने वेळोवेळी निर्धारित केलेल्या स्वरूपानुसार योग्य प्राधिकार्याद्वारे जारी केलेल्या ओबीसी प्रमाणपत्र परिशिष्ट -II क्रिमीलेयर स्थितीमध्ये अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेच्या तीन वर्षांच्या आत मिळालेले असावे.
प्रमाणपत्राच्या स्वसाक्षांकित प्रति शैक्षणिक पात्रता/ व्यवसायिक पात्रता /जन्म तारखेचा पुरावा जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र दहावीचे मार्क मेमो किंवा समक्ष प्रमाणपत्र ज्यामध्ये जन्मतारीख नमूद आहे दिव्यांग प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.परीक्षेसाठी उमेदवारांना कोणतेही TA/DAदिले जाणार नाही.
नेव्हल मुंबई डॉकयार्ड निवड प्रक्रिया
नेव्हल मुंबई डॉकयार्ड मुंबई भरतीसाठी पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा आणि व्यापार परीक्षेसाठी हजर राहावे लागेल लेखी परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी कोणत्याही नकारात्मक गुणांकन केले जाणार नाही.
जर प्राप्त अर्जांची संख्या रिक्त पदांच्या प्रमाणात खूप जास्त असेल आणि सर्व उमेदवारांना लेखी परीक्षा कौशल परीक्षेसाठी बोलावणे सोयीचे किंवा शक्य नसेल तर विभागाच्या विवेक बुद्धीनुसार विभाग पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांची संख्या मर्यादित प्रत्येक रिक्त पदासाठी 20 किंवा अधिक करू शकते.
निवड प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीसाठी दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी.