Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाजकल्याण विभागात 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी! 219 पदांची भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!!

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे गट- क संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (सर्वसाधारण), गृहपाल महिला, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व टंकलेखक असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खालील जाहिरातीमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. समाज कल्याण विभाग भरती अर्ज ऑनलाईन करायचे आहे. जाहिरातीत नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे. (कायमस्वरुपातील) सरकारी नोकरी मिळवण्याची उमेदवारांना ही अत्यंत चांगली संधी प्राप्त झाली आहे, या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा व नोकरी मिळवावी. सरकारी व खाजगी नोकरी विषयक माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnukri.in

समाज कल्याण विभाग भरती अर्ज शुल्क

समाज कल्याण विभाग भरती अर्ज करण्याचे खुल्या प्रवर्गासाठी 1000/- रुपये, आणि राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना 900/- रुपये अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे.

समाज कल्याण विभाग भरती वयोमर्यादा

समाज कल्याण विभाग भरती मध्ये 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे इतर मागासवर्गीय उमेदवार एससी /एसटी यांना वयोमर्यादा 05 वर्ष सूट दिलेली आहे.(वयोमर्यादेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी मुळ जाहिरात वाचावी)

समाज कल्याण विभाग भरती शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 219 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे गट- क संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (सर्वसाधारण), गृहपाल महिला, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व टंकलेखक आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदांनुसार बघून पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा महाराष्ट्र शासन मान्य पदवीस सम कक्ष म्हणून मान्य केलेली अर्हता शारीरिक शिक्षण विषयातून शासनमान्य पदवी असणाऱ्या उमेदवारांसाठी प्राधान्य + MS-CIT प्रमाणपत्र किंवा समक्ष संगणक विषयात अर्हता
गृहपाल (सर्वसाधारण)
गृहपाल महिलामान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतून पदवी किंवा महाराष्ट्र शासन मान्य असलेली समकक्ष मान्यता म्हणून केलेली अर्हता शारीरिक शिक्षण विषयातून पदवी असल्यास प्राधान्य.
एमएससीआयटी प्रमाणपत्र परीक्षा किंवा समकक्ष कॉम्प्युटरची अर्हता असणे आवश्यक आहे.
समाज कल्याण निरीक्षकमान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समक्ष म्हणून मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातून शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य)
एम एस सी आय टी प्रमाणपत्र किंवा समतुल्य संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक.
उच्च श्रेणी लघुलेखकशासन मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10वी पास + शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळातून 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी व मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट/मराठी आणि इंग्रजी 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य त्यासोबतच MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक
निम्नश्रेणी लघुलेखकमान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण+ सरकार मान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळातून १२० शब्दप्रतिम मिनिट इंग्रजी व मराठी लागू लेखन परीक्षा उत्तीर्ण. (इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीतील शब्द प्रति मिनिट)/मराठी आणि इंग्रजी 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य आणि एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र
लघु टंकलेखकमान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास आणि लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनातील व्यक्ती शब्द प्रति मिनिट शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र धारक असले पाहिजे.
समाज कल्याण विभाग भरती अर्ज प्रक्रिया

समाज कल्याण विभाग भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेल्या खालील सविस्तर मूळ जाहिराती समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करायची आहेत.विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज परिपूर्ण भरावा अपूर्ण अर्ज रद्द ठरवण्यात येईल.

समाज कल्याण विभाग भरती मासिक वेतन

समाज कल्याण विभाग मासिक वेतन पदांनुसार खालील टेबल मध्ये दिलेले आहे.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
समाज कल्याण विभाग भरती निवड प्रक्रिया

उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने वस्तूनिष्ठ चाचणी घेतली जाईल. गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. समाज कल्याण विभाग भरती निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती मुळे जाहिरातीत नमूद करण्यात आलेली आहे. खाली लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात मध्ये निवडणूक ची माहिती वाचून घ्यायची आहे.

Samaj Kalyan Vibhag Pune Bharti Vacancy Details

ऑनलाईन अर्ज लिंक सुरुवात होण्याची तारीख : 10 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन अर्जाची सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांचे कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही दिलेल्या शेवटच्या तारखे आधी इच्छुक व पात्र उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.


सविस्तर मूळ जाहिरात
येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट
येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक
अर्ज येथे करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉