UCO Bank Bharti 2024 : युको बँक मध्ये 545 पदांसाठी भरती सुरू ऑनलाईन अर्ज करा;

UCO Bank Bharti 2024

UCO Bank Bharti 2024 : युनायटेड कमर्शियल बँक (युको) बँक अंतर्गत 544 (महाराष्ट्रात एकूण – 31 )रिक्त जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे पदांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ उमेदवार असे आहे. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीसमोर क्लिक करून संपूर्ण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचा आहे.या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जुलै 2024 आहे बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा उमेदवारांनी संपूर्णपणे लाभ घ्यावा बँकेत नोकरी मिळवावी नोकरी अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
युनायटेड कमर्शियल बँक भरती अर्ज शुल्क

युनायटेड कमर्शियल बँक मध्ये भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्याचे कोणतेही अर्ज शुल्क भरणे नाही अर्ज निशुल्क आहेत.

युनायटेड कमर्शियल बँक भरती वयोमर्यादा

युनायटेड कमर्शियल बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयमर्यादा 20 ते 28 वर्ष दिली गेली आहे. वयोमार्यादेत इतर मागासवर्गीय उमेदवार एससी/एसटी यांना 05 वर्ष सूट दिलेली आहे व ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्षे वयोमार्यादेत सूट दिली आहे सरकारी नियमाप्रमाणे.

युनायटेड कमर्शियल बँक भरती वेतन

युनायटेड कमर्शियल बँक मध्ये शिकाऊ (अप्रेंटीस) या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना रु.15.000/- स्टायपेंड दिले जाणार आहे.

युनायटेड कमर्शियल बँक भरती शैक्षणिक पात्रता

युनायटेड कमर्शियल बँक मध्ये भरती एकूण रिक्त 544 जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे पदांचे नाव हे शिकाऊ उमेदवार असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये दिली आहे शाईस्खानिक पात्रता पाहून पदासाठी अर्ज ऑनलाईन करायचे आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवारमान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर
युनायटेड कमर्शियल बँक भरती अर्ज प्रक्रिया

युनायटेड कमर्शियल बँक भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज थेट ऑनलाईन करू शकता. ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक प्रमाणपत्रे आपलोड करावी.दिलेल्या सविस्तर जाहिरातीत भरतीची संपूर्ण माहिती नमूद आहे आवश्यक महितीसाठी संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यावी.

युनायटेड कमर्शियल बँक भरती निवड प्रक्रिया

युनायटेड कमर्शियल बँक भरती मध्ये अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बँक च्या स्वतःच्या विचाराप्रमाणे केलेल्या लेखी परीक्षेची चाचणी घेतली जाऊ शकते उमेदवारांना बँकेच्या वेबसाईटवर लेखी परीक्षेसाठी नोंदणी करण्याची आणि अनिवार्य फी भरण्याची आवश्यकता आहे. लेखी परीक्षा नंतर मेरिट लिस्ट राज्यानुसार आणि श्रेणीनुसार तयार केली जाईल. उमेदवारांच्या शिक्षणानंतर एक वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव असल्यास त्यांना अप्रेंटीसशिपच्या पदासाठी निवड केली जाईल. उमेदवारांना राज्यातील स्थानिक भाषेचे ज्ञान वाचन लेखन बोलणे आणि समजणे आवश्यक आहे. भाषेच्या ज्ञानाची चाचणी भरती प्रक्रियेचा भाग म्हणून करण्यात येईल निवड प्रक्रियेचे संपूर्णपणे माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून घ्यायची आहे.

UCO Vacancy Details 2024

ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 02 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेनंतर उमेदवारांना भरतीसाठी कोणत्याही माध्यमातून अर्ज करता येणार नाही.

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जअर्ज करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉