Supreme Court Of India Recruitment : 10 वी पास उमेदवारांना सुप्रीम कोर्ट अंतर्गत नोकरीची संधी! 80 रिक्त पदांसाठी भरती अर्ज सुरू!

Supreme Court Of India Recruitment

Supreme Court Of India Recruitment : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 80 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकी ज्ञान) असे आहे. पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि सोबत दिलेली सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाइन अर्जाची सुरुवात 23 ऑगस्ट 2024 पासून होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे. भरतीच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अर्ज शुल्क

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये भरती अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना रु.400/- अर्ज शुल्क लागणार आहे व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी माजी सैनिक/ न्यायीकदृश्ट्या विभक महिला, यांना अर्ज शुक्ल 200/- रुपये लागणार आहे. अर्जाचे शुल्क हे ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया वयोमर्यादा

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार शासकीय सेवेतील कर्मचारी यांना वयोमार्यादेत शासकीय नियमाप्रमाणे सूट दिलेली आहे.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मासिक वेतन

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकी ज्ञान) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे रु.21700 ते 46210/-रु. दिले जाणार आहे.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया शैक्षणिक पात्रता

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत कनिष्ठ न्यायालय अंतर्गत एकूण 80 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पदांचे नाव हे परिचार स्वयंपाकी ज्ञान आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यता प्राप्त मंडळ/ संस्था कडून इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोबतच स्वयंपाक/पाककला या विषयातून किमान एक वर्षाचा पूर्ण वेळ डिप्लोमा असणे आवश्यक आहे. (शैक्षणिक पात्रतेची पूर्णपणे माहिती बघण्यासाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.)

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अर्ज प्रक्रिया

कनिष्ठ न्यायालयाच्या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी पदासाठी विहित पात्रता पूर्ण करत असल्याची खात्री करावी. अर्ज करताना स्कॅन केलेली स्वाक्षरी पासपोर्ट फोटो इतर आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावे.

अर्ज अंतिम सबमिट करण्याआधी अर्ज योग्य भरल्याची खात्री करावी कारण एकदा सबमिट केलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया निवड प्रक्रिया

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती मध्ये उमेदवारांची निवड वस्तुनिष्ठ प्रकारच्या लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. आणि उमेदवारांची कौशल्य चाचणी आणि मुलाखत घेतली जाणार आहे. (निवड प्रक्रियेची माहिती, परीक्षेचे स्वरूप इतर माहिती सविस्तर जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली आहे पूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या सविस्तर मुळे जाहिरात च्या समोरील लिंक वर क्लिक करून निवड प्रक्रियेची माहिती वाचून घ्यायची आहे)

Supreme Court Of India Recruitment Notification 2024

ऑनलाईन पद्धतीने अर्ज लिंक सुरुवात होण्याची तारीख : 23 ऑगस्ट 2024 या रोजीपासून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2024 या तारखेच्या आत इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. व शेवटच्या तारखे आधी अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा (23 ऑगस्ट पासून सुरू)
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉