RRB Technician Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्डाने (RRBs) रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसारित केली आहे.रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे ‘टेक्निशियन ग्रेड III’ असे आहे. या पदांच्या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार देण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची अर्ज प्रक्रियेची, आणि वेतन श्रेणी, वयोमर्यादा, अर्जाचे शुल्क महत्वाच्या दिनांक आणि इतर आवश्यक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. रेल्वेमध्ये नोकरीची उमेदवारांना ही सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे, या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा रेल्वे भरती टेक्निशियन अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 ही आहे. तसेच उमेदवारांनी अधिक माहिती करिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
रेल्वे भर्ती बोर्ड टेक्निशियन भरती अर्ज शुल्क
रेल्वे भरती बोर्ड (RRB) मध्ये अर्ज करण्याचे सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना रू.500/- आणि राखीव प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी यांना रू.250/- अर्ज शुल्क लागणार आहे.
रेल्वे भर्ती बोर्ड टेक्निशियन भरती वयोमर्यादा
रेल्वे भरती बोर्ड बोर्ड मध्ये भरती वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष दिलेली आहे. आणि राखीव प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी 05 वर्ष सूट दिलेली आहे.
रेल्वे भर्ती बोर्ड टेक्निशियन भरती शैक्षणिक पात्रता
नोकरी शोधत असणाऱ्या 10वी/आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. रेल्वे भरती बोर्ड RRB अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण तब्बल 14,298 पदांची भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव ‘टेक्निशियन ग्रेड III’ हे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यता प्राप्त बोर्ड /संस्थेतून इयत्ता 10वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स/डिझेल मेकॅनिक/इलेक्ट्रिकल/वेल्डर/मशिनिस्ट/रीगर/फिटर/टर्नर) पास संबंधित शाखेतून डिप्लोमा पास उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.(संपूर्ण महितीसाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे).
रेल्वे भर्ती बोर्ड टेक्निशियन भरती अर्ज प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
सद्यस्थितीत वापरात असणारा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असणे गरजेचे आहे.
ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि आधार कार्ड सोबत असावे.उमेदवारांनी अर्जातील माहिती परिपूर्ण भरायचे आहे अपूर्ण माहितीसह अर्ज असल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
RRB Technician Bharti Vacancy Details 2024
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख : 02 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 16 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या नंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घेवून अर्ज शेवटच्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |