PGCIL Bharti 2024 : पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL LTD) अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता सर्वेक्षण अभियांत्रिकी, सर्वेक्षक, ड्राफ्ट्समन पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण महितीसाठी सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. भरतीच्या अपडेट्स पाहण्याकरिता रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.
पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्ज शुल्क
पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये कनिष्ठ अभियंता या पदासाठी रुपये 300 सर्वेक्षक ड्राफ्ट्समन या पदांसाठी अर्ज शुल्क 200 रू. लागणार आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराशी असती यांना अर्ज शुल्क मध्ये सूट देण्यात आली आहे अर्ज शुल्क पूर्ण माहिती पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.
पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड वयोमर्यादा
पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती अर्ज करण्यासाठी कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियांत्रिकी ) या पदासाठी 31 वर्षे व सर्वेक्षक आणि ड्राफ्ट्समन पदासाठी 32 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.
पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मासिक वेतन
पदांचे नाव | वेतन |
सर्वेक्षक | रु.22,000/-ते 85,000/- |
ड्राफ्ट्समन | रु.22,000/-ते 85,000/- |
कनिष्ठ अभियंता सर्वेक्षण अभियांत्रिकी | रु.26,000/-ते 1,18,000/- |
पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड शैक्षणिक पात्रता
पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 38 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. पदांचे नाव सर्वेक्षण अभियांत्रिकी, सर्वेक्षक, ड्राफ्ट्समन असे या पदांसाठी उमेदवार डिप्लोमा ITI असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण महितीसाठी दिलेली सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्ज प्रक्रिया
पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती होण्यासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करता येईल.
अर्ज करताना उमेदवारांनी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड निवड प्रक्रिया
प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची संगणक आधारित परीक्षा घेतली जाईल निवडलेल्या उमेदवारांची व्यापार चाचणी केली जाईल आणि उमेदवारांची शॉर्टलिस्ट तयार केली जाईल. परीक्षा ही 02 तासांची असणार आहे.
लेखी परीक्षा मध्ये पात्र उमेदवारांना व्यापार चाचणीसाठी बोलावण्यात येईल निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती सविस्तर मूळ जाहिरातीमध्ये नमूद आहे पूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
PGCIL Bharti Vacancy Details 2024
अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 07 ऑगस्ट 2024 रोजीपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024 तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून अर्ज या भरतीसाठी स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि त्वरित अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |