North Central Railway Bharti 2024 : उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. पदांच्या एकूण तब्बल 1679 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे प्रशिक्षणार्थी असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिली गेली आहे शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. उत्तर मध्य रेल्वे भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.रेल्वे भरती व इतर भरतीच्या अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
उत्तर मध्य रेल्वे अर्ज शुल्क
उत्तर मध्य रेल्वे मध्ये अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क 100/- रुपये इतरमागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास एससी/एसटी पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क लागू नाही.
उत्तर मध्य रेल्वे वयोमर्यादा
उत्तर मध्य रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 15 ते 24 वर्ष वयोमर्यादा दिलेले आहे मागासवर्गीय प्रवर्गातील एससी/एसटी ओबीसी उमेदवारांना वयोमर्यादेत 05 वर्ष सूट दिलेली आहे शासकीय नियमानुसार.
उत्तर मध्य रेल्वे शैक्षणिक पात्रता
उत्तर मध्य रेल्वे मध्ये रिक्त पदांच्या एकूण 1679 जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित केली गेली आहे रिक्त पदांचे नाव ‘प्रशिक्षणार्थी’असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील टेबलमध्ये बघून घ्यायची आहे अधिक महितीकरिता खालील सविस्तर मूळ जाहिरातीसमोर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशिक्षणार्थी | उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक्युलेशन /10वी परीक्षा (SSC) किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा अंतर्गत) किमान एकूण 50% गुणांसह पास असणे आवश्यक आहे. आणि भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त NCVT/SCVT द्वारे लागू असलेल्या संबंधित ट्रेड मध्ये ITI पास असणे आवश्यक आहे. |
उत्तर मध्य रेल्वे अर्ज प्रक्रिया
वरील पदाचा अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
खाली दिलेल्या लिंक द्वारे थेट ऑनलाईन अर्ज करता येईल.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक लागणारे शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करायची आहे.
अर्ज करण्या अगोदर भरतीची मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.
उत्तर मध्य रेल्वे वेतन
प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून नियुक्त केलेल्या उमेदवारांसाठी शिकव प्रशिक्षण एक वर्ष कालावधी मध्ये विहित केलेल्या परीक्षणा दरम्यान सरकारद्वारे शासित नियमानुसार स्टायपेंड दिला जाईल.
उत्तर मध्य रेल्वे निवड प्रक्रिया
प्रशिक्षणार्थी कायद्यानुसार प्रशिक्षण देण्याकरिता पात्र अर्जदारांची निवड गुणवत्ता यादीवर आधारित असणार आहे जी एकूण गुणांची सरासरी घेऊन तयार करण्यात येईल.
सूचीबद्ध केलेल्या शॉर्टलिस्टड उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल.
अंतिम गुणवत्ता यादी युनिट नुसार ट्रेडनिहाय आणि प्रवर्गानुसार तयार केली जाईल मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने स्लॉटची संख्या विचारात घेवून निवड करण्यात येईल
निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात लिंकवर क्लिक करून वाचावी.
North Central Railway Recruitment Notification 2024
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 16 सप्टेंबर 2024 पासून भरती अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांचे कोणत्याही माध्यमातून अर्ज या भरतीसाठी स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व त्वरित अर्ज ऑनलाईन करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |