NHM Palghar Bharti 2024 : आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित!उमेदवारांना नोकरीची चांगली संधी

NHM Palghar Bharti 2024

NHM Palghar Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर अंतर्गत एमपीडब्ल्यू-पुरुष, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी व इतर पदांच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारीत करण्यात आलेली आहे. या पदांच्या आवश्यक शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसमोरील लिंक वर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. NHM पालघर भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे. भरती अपडेट्स बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर भरती अर्ज शुल्क

राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर भरती साठी अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर भरती वयोमर्यादा

खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 38 वर्षे व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे वयोमार्यादा दिलेली आहे व रुग्णसेवेतील पदे उदा. परिचारिका,तंत्रज्ञ, समुपदेशक पदांसाठी वयोमार्यादा 65 वर्षे दिलेली आहे.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर भरती अर्ज शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर येथे एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे पदांचे नाव हे एमपीडब्ल्यू-पुरुष, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी व इतर पदे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता विषयी माहिती दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीत नमूद केलेली आहे शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर भरती अर्ज प्रक्रिया 2024

आरोग्य विभाग जिल्हा परिषद भरती अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या खालील पत्त्यावर पाठवायचा आहे.

अर्ज करताना शैक्षणिक अर्हतेचे सर्व वर्षांचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका, लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र, उमेदवारांच्या नावात बदल असल्यास शासनाचे राजपत्र, पासपोर्ट आकारातील फोटो आधार कार्ड पॅन कार्ड, मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रति अर्जाच्या सोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : जिल्हा परिषद इ. बोईसर रोड कोळगाव 113 ते 114 1 ला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर भरती निवड प्रक्रिया

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर भरती निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जावरून गुणांकनुसार मेरिट यादी तयार करण्यात येईल. मेरिट लिस्ट जिल्हा परिषद च्या https://zppalghar.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिलेल्या सविस्तर जाहिरातीत नमूद करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

NHM Palghar Bharti Vacancy Details 2024

अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 22 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेच्या अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉