MSRTC Yavatmal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक असलेल्या अटींची पूर्तता करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांचे नाव शिकाऊ उमेदवार महिला/ पुरुष आहे.या भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 देण्यात आली आहे.पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, महत्त्वाच्या तारखा व इतर आवश्यक माहिती खालील लेखामध्ये दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी. महामंडळ) अंतर्गत काम करण्याची उमेदवारांना ही चांगली संधी प्राप्त झाली आहे या संधीचा लाभ घ्यावा आणि MSRTC मध्ये अंतर्गत प्रशिक्षण मिळवावे.सरकारी व खाजगी नोकरी संदर्भातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अर्ज शुल्क
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज करीत असलेल्या उमेदवारांना रु.590/- आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना रु.295/- अर्ज शुल्क लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ भरती वयोमर्यादा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ भरतीमध्ये उमेदवारांना 18 ते 33 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी मर्यादेत 05 वर्ष सूट दिली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ भरती शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ मध्ये रिक्त एकूण 208 जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव शिकाऊ उमेदवार महिला/ पुरुष हे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून 10वी उत्तीर्ण (SSC) आणि मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून संबंधित व्यवसाय (Trade) मधून ITI (NCVT/SCVT) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.शैक्षणिक पात्रता व इतर पूर्ण माहिती बघण्यासाठी दिलेल्या खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ भरती अर्ज प्रक्रिया
MSRTC यवतमाळ भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी करणे आवशयक आहे.
अर्ज करण्या अगोदर पात्र असलेले इच्छुक उमेदवारांनी दिलेली मूळ जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचून दिलेली विहित पात्रता धारण करत असल्याची खात्री करावी.
अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रतेची आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया योग्यवेळी उमेदवारांना MSRTC द्वारे कळविण्यात येईल.
उमेदवारांनी अर्ज भरताना सर्व माहिती परिपूर्ण भरणे आवश्यक आहे अपूर्ण माहिती सह भरलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज सादर करतेवेळी अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेचा MSRT Fund Account, Yavatmal, या नावे सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांनी 590/- आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी 295/- रु. चा डी.डी. जोडणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,यवतमाळ विभाग, विभागीय कार्यालय,आर्णी रोड,यवतमाळ-445001
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ भरती निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेची माहिती मूळ जाहिरातीमध्ये नमूद नाही कदाचित या भरतीसाठी प्राप्त अर्जाच्या छाननी नंतर उमेदवारांची निवड करण्यात येईल. या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना राज्य परिवहन मध्ये सामावून घेण्याबाबत कोणताही विचार केला जाणार नाही किंवा राज्य परिवहन महामंडळावर तसे कोणतेही बंधन राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
MSRTC Yavatmal Recruitment Important Dates
ऑनलाईन “नोंदणी” अर्ज सुरूवात होण्याची तारीख : 25 नोव्हेंबर 2024 रोजी पासून.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2024 आहे उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करायचे आहे देय तारखेच्या नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे व त्वरित अर्ज पाठवायचे आहेत.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |
नोकरी अपडेटसाठी ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |