MPSC Group B Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभाग अंतर्गत विविध संवर्गाच्या रिक्त जागा भरण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र गट – ब (अराजपत्रित) महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर चाचणी घेऊन निवड करण्यात येईल. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा. सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा. www.mahasarkarnukri.in
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अर्ज शुल्क
MPSC गट – ब भरती अर्ज करण्यासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 719/- रुपये आणि मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल विभाग, अपंग,अनाथ उमेदवारांना 449/- रुपये अर्ज शुल्क लागणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब वयोमर्यादा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब भरती वयोमर्यादा 19 ते 38 वर्षे दिलेली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभाग अंतर्गत विविध संवर्गाच्या रिक्त जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरती जाहीर करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव सहाय्यक कक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, राज्यकर निरीक्षक, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समकक्ष असणारी शासनाने घोषित केलेल्या इतर कोणत्याही तत्सम अर्हता.
- पदवी परीक्षेस बसलेल्या उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र ठरतील, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे संबंधित संवर्गासाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांक पर्यंत पदवी परीक्षा पास होणे आवश्यक राहील.(इंटर्नशिप) किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकांनी ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक पर्यंत पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब भरती अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरातीत नमूद सूचना व अटी काळजीपूर्वक वाचाव्या.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब निवड प्रक्रिया
शारीरिक चाचणी गुण पात्रता स्वरूपाचे असून एकूण गुणांपैकी किमान 60% गुण म्हणजे 5/7 होण्यासाठी आवश्यक राहील. तसेच या गुणांना अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही.
शारीरिक चाचणीमध्ये किमान 60% गुणधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता 40 गुणांची मुलाखत घेतली जाईल.
मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीतील गुण यांच्या एकत्रित गुणांच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी निवड प्रक्रिया राबविली जाईल.
आयोगाच्या संकेतस्थळावर स्वातंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना, पद्धतीने नुसार पूर्व परीक्षेचा निकाल व मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल प्रक्रिया राबविण्यात येईल.
मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाकडून निश्चित केलेल्या गुणांच्या सीमारेषा व मर्यादेनुसार संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशा करिता अर्हतापात्र ठरणाऱ्या तसेच जाहिराती/अधिसूचनेतील तरतुदीनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना संबंधित मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.संबंधित परीक्षेच्या प्रवेश पत्रावर नमूद असलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेसाठी उपस्थिती करिता पात्र ठरविले जाईल.
MPSC Group B Bharti Vacancy Details 2024
अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 14 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची तारीख आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |