Maharashtra Homeguard Bharti 2024 : होमगार्ड भरती 2024 ; जिल्हानिहाय जाहिराती प्रकाशित

Maharashtra Homeguard Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकरिता ही मोठी बातमी आहे. गृह विभागातर्फे आजपासून होमगार्ड भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे सुमारे 9700 पदांची ही भरती होण्याची शक्यता आहे. होमगार्ड पदा करिता राज्याचे उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरुवात होत आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे. १५ जुलै 2024 पासून सातारा तर इतर जिल्ह्यांसाठी ऑनलाईन अर्ज ची लिंक 25 जुलै 2024 या तारखेपासून सुरू केली जाणार आहे. आणि बीड होमगार्ड साठी अर्ज ची लिंक 26 जुलै 2024 या तारखेपासून सुरू होणार आहे.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

होमगार्ड नोकरीसाठी 20 ते 50 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे. जवळपास 06 वर्षानंतर ही भरती प्रक्रिया करण्यात येत आहे यापूर्वी 2018- 19 या वर्षात होमगार्ड पदाकरिता भरती करण्यात आलेली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा ही भरती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील होमगार्ड भरतीसाठी उमेदवारांना शारीरिक क्षमता परीक्षा द्यावे लागणार आहे.आणि त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे व वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे वैद्यकीय चाचणीच्या नंतर उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली जाणार आहे.

महा होमगार्ड भरती 2024 साठी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा. अर्ज करण्या अगोदर होमगार्ड भरती पीडीएफ शेवटची तारीख वेळापत्रक अभ्यासक्रम निवड प्रक्रिया यासारखे अधिक माहिती करिता दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

अर्ज आणि जिल्हा नुसार अर्ज करण्यासाठी लिंक अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिली आहे. होमगार्ड पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना रहिवासी ठिकाण असलेल्या पोलीस स्टेशन क्षेत्रातच अर्ज करता येईल इतर अर्ज बाद ठरविण्यात येईल. अर्ज करण्या अगोदर जाहीर होणाऱ्या अंतिम अधिसूचनेमध्ये रिक्त जागांची माहिती दिली जाईल.

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 महत्वाची कागदपत्रे

रहिवासी पुरावासाठी (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र)
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र SSC बोर्ड प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला.
तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र असल्यास.
खाजगी नोकरीमध्ये कार्यरत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र.
तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र.

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 वयोमर्यादा

महाराष्ट्र होमगार्ड भरतीकरिता उमेदवाराचे वय 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षांच्या आत असावे.

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 शारीरिक पात्रता

पुरुषांकरिता उंची – 162 से.मी. व महिलांसाठी – 150 से.मी.
छाती फक्त पुरुष उमेदवारांसाठी लागू (न फुगविता किमान) 76 से.मी. कमीत कमी 05 से.मी. फुगवणे आवश्यक.

महाराष्ट्र होमगार्ड भरती वेतनश्रेणी

पदासाठी निवड केलेल्या उमेदवारांना बंदोबस्त काळात प्रति दिवस रुपये.570/- कर्तव्य भत्ता 100/- रुपये उपहार भत्ता दिला जाईल. प्रशिक्षण काळात रू. 35 खिसाभत्ता भोजन भत्ता आणि साप्ताहिक कवायतीसाठी रू. 90 कवायत भत्ता दिला जातो.

महाराष्ट्र होमगार्ड भरती शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य होमगार्ड भरती अर्ज करण्यासाठी उमेदवार कमीत कमी 10 वी उत्तीर्ण (SSC) असणे आवश्यक आहे.अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

महाराष्ट्र होमगार्ड भरती अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज करण्याची प्रत्येक जिल्ह्यातील अर्ज कालावधी वेगळा आहे ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वि मूळ जाहिरात पहा.

होमगार्ड भरती 2024 जिल्हानिहाय महत्वाच्या लिंक

जिल्हा निहाय माहिती/जाहिरात बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

संपूर्ण जिल्हा जाहिरातीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे अर्ज करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉