Mahanirmiti Technician Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (MahaGenco) द्वारे रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसारित झाली आहे.रिक्त जागांसाठी पदांचे नाव तंत्रज्ञ-३ हे आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व वीजनिर्मिती केंद्रांवर एकूण रिक्त पदांची संख्या सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन सरळ सेवा परीक्षा अंतर्गत ही भरती केली जात आहे. तंत्रज्ञ -३ या रिक्त पदांसाठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता, महत्त्वाच्या तारखा,अर्ज प्रक्रिया, व इतर महत्त्वाची माहिती खालील दिलेल्या जाहिरातीत काळजीपूर्वक वाचायची आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मती कंपनी अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या जाहिराती द्वारे रिक्त असलेल्या पदांसाठी उमेदवारांना नोकरीची खूप मोठी संधी उपलब्ध झालेली आहे, या संधीचा उमेदवारांनी संपूर्णपणे लाभ घेऊन चांगली नोकरी मिळवावी. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि. भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.नोकरी संदर्भातील अपडेट्स मिळवण्यासाठी दररोज वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती परीक्षा शुल्क
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती अर्ज करण्याचे सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना रू.500/- आणि मागासवर्गीय उमेदवारांना रू.300/- शुल्क लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती वयोमर्यादा
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती मध्ये 18 वर्षे ते 38 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे. वयोमर्यादा 01.10.2024 या तारखेस गणण्यात येईल. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे वयोमर्यादा शिथिल राहील.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महानिर्मिती) अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 800 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जागांसाठी पदांचे नाव तंत्रज्ञ-3 हे आहे. पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता संबंधित ट्रेडमध्ये शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आय.टी.आय. उत्तीर्ण. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCVT)/(MCVT) पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि आय.टी.आय. व्यवसाय (Trade) बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरील लिंकवर क्लिक करून मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे र्ज लिंक खाली दिलेली आहे.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ऑनलाईन परीक्षा निवड यादी प्रसारित केल्यानंतर उमेदवाराकडून दिलेले पर्याय निवडताना चुक, आढळून आल्यास, उमेदवारांच्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
ऑनलाइन परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची रुपरेषा, परीक्षा केंद्र, परीक्षेचे वेळापत्रक, बैठक क्रमांक इत्यादी माहिती महानिर्मितीच्या अधिकृत www.mahagenco.in या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करून दिले जाईल.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असल्याने, अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे, व इतर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक नाही, ऑनलाइन अर्ज मध्ये संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे व अर्जात भरलेल्या माहितीच्या अनुषंगाने ती सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास असल्याबाबतची सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी राहील.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना काही त्रुटी राहिल्यास अर्ज संगणकाद्वारे स्वीकारण्यात येणार नाही, त्यामुळे अर्ज परिपूर्ण भरण्याची काळजी घ्यावी, ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक भरावा उत्सुक अर्ज भरण्याची जबाबदारी स्वतः उमेदवाराची राहिल.
दिलेले विहित अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे शुल्क भरण्यासाठी नेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड या सुविधेचा वापर करून परीक्षा शुल्क भरता येईल.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती निवड प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती मध्ये उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल आणि पात्र उमेदवारांच्या मुलाखती व कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीमद्धे नमूद आहे संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात बघा.
MahaGenco Technician Bharti Vacancy Important Dates
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 26 नोव्हेंबर 2024 रोजी पासून अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन करायचे आहे शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज कोणत्याही प्रकारे स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व त्वरित अर्ज करावे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |
Officers