MAHA REAT Bharti 2024 | महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती अर्ज सुरू

MAHA REAT Bharti 2024

MAHA REAT Bharti 2024 : महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलिय न्यायाधिकरण,मुंबई कार्यालयातील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे खाजगी सचिव,निम्न श्रेणी लघुलेखक,स्वीय सहायक,वित्त व लेखाधिकारी,अधीक्षक,माहिती तंत्रज्ञान अधिकारी,लघुटंक लेखक,तांत्रिक सहायक,सहायक अधीक्षक अभिलेखापाल,कनिष्ठ लिपिक,वाहन चालक आणि शिपाई असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळी आहे,संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खालील जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.महाराष्ट्र रिअल इस्टेट अपीलीय न्यायाधिकरण मुंबई भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 आहे.नोकरीच्या अशाच माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkanaukri.in

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई अर्ज शुल्क

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपीलीय न्यायाधिकरण मुंबई भरतीमध्ये अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क लागणार नाही.

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई वयोमर्यादा

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपीलीय न्यायाधिकरण मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयोमार्यादाची कोणतीही अट दिलेली नाही.

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपीलीय न्यायाधिकरण मुंबई, अंतर्गत एकूण 24 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे खाजगी सचिव,निम्न श्रेणी लघुलेखक,स्वीय सहायक,वित्त व लेखाधिकारी,अधीक्षक,माहिती तंत्रज्ञान अधिकारी,लघुटंक लेखक,तांत्रिक सहायक,सहायक अधीक्षक अभिलेखापाल,कनिष्ठ लिपिक,वाहन चालक आणि शिपाई असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे खालील टेबल मध्ये दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची व अर्ज प्रक्रियेची पूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
खाजगी सचिवमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (विधी पदवीधारक असल्यास प्राधान्य दिले जाईल)
निम्न श्रेणी लघुलेखकमान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी
स्वीय सहायकमान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी
वित्त व लेखाधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी प्राधान्याने लेखा,वाणिज्य किंवा सांख्यिकी असणे आवश्यक आहे.
माहिती तंत्रज्ञान अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदवी
अधीक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी
सहायक अधीक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी
लघुटंक लेखकमान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी
तांत्रिक सहायकमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदवी
अभिलेखापालमान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी
कनिष्ठ लिपिकमान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी
वाहन चालकउच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शिपाईउच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलिय न्यायाधिकरण,मुंबई मासिक वेतन

महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलिय न्यायाधिकरण,मुंबई मध्ये मासिक वेतन पदांनुसार खालील प्रमाणे दिले जाणार आहे.

MAHA REAT Bharti 2024
महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज दिलेल्या विहित नमुन्यात पूर्ण भरून सोबत आवश्यक लागणारी शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडून दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा कुरीअरने पाठवायचे आहे.अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली नमूद आहे.

अर्जातील पत्र व्यवहाराचा पत्ता मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अचूक भरावा.अर्ज पाठवताना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचे नाव ठळक अक्षरात लिहायचे आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : महाराष्ट्र रीअल इस्टेट अपील न्यायाधिकरण, पहिला मजला,एक फोर्ब्स इमारत,थापर हाऊस,डॉ. व्ही.बी.गांधी रोड,काला घोडा,फोर्ट मुंबई – 400 001. या पत्त्यावर अर्ज पाठवयचे आहे.

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई निवड प्रक्रिया

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई मध्ये निवड प्रक्रियाबद्दल पूर्ण माहिती मूळ जाहिरातीमद्धे नमूद आहे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात मध्ये निवड प्रक्रियेची माहिती बघून घ्यायची आहे.

Maha REAT Recruitment Notification 2024

ऑफलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 25 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवून द्यायचे आहे शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज अपात्र ठरविले जाईल.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : महाराष्ट्र रीअल इस्टेट अपील न्यायाधिकरण, पहिला मजला,एक फोर्ब्स इमारत,थापर हाऊस,डॉ. व्ही.बी.गांधी रोड,काला घोडा,फोर्ट मुंबई – 400 001.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉