KTCL Goa Bharti 2024 : कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा अंतर्गत रिक्त जागा भरण्याची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे कंडक्टर आहे. पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे.पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, महत्त्वाच्या तारीख, आणि इतर आवश्यक माहिती खालील लेखामध्ये काळजीपूर्वक वाचून इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेला आधी अर्ज पाठवायचे आहे. नोकरीविषयक माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा. www. mahasarkarnukri.in
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा भरती अर्ज शुल्क
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा भरती अर्जाचे कोणतेही शुल्क लागणार नाही.
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा भरती वयोमर्यादा
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा मध्ये 45 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.वयोमर्यादामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासकीय नियमाप्रमाणे सूट वयोमर्यादाच्या पूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी.
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा भरती शैक्षणिक पात्रता
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 70 जागा भरण्यात येणार आहेत त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रिक्त पदांचे नाव कंडक्टर हे आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक त्याचसोबत परिवहन शासन संचालनालयाकडून जारी केलेला कंडक्टर परवाना आणी गोव्याचे बॅज असणे आवश्यक आहे.आवश्यक अधिक माहितीकरिता खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचू शकता.
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा भरती अर्ज प्रक्रिया
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा मध्ये भरती होण्यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी पदासाठी विहित अर्हता धारक असल्याची खात्री करावी. अर्ज करण्या अगोदर भरतीची नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायची आहे.
दिलेल्या खालील पत्त्यावर अर्जासोबत पासपोर्ट आकारातील फोटो आवश्यक शैक्षणिक आणि इतर प्रमाणपत्रे जोडून अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायसोदे गोवा अल्टो पोर्वोरीम, बारदेझ गोवा 403521
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा भरती वेतन
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा मध्ये कंडक्टर या पदासाठी उमेदवारांना प्रतीदिवस 733/-रुपये वेतन दिले जाणार आहे.
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा भरती निवड प्रक्रिया
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा मध्ये निवड प्रक्रियाविषयी माहिती मूळ जाहिरातीत नमूद नाही कदाचित पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड केली जाईल.
KTCL Goa Bharti Vacancy Details 2024
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 11 नोव्हेंबर 2024 पासून ऑफलाईन अर्ज सुरु झालेले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज पाठवायचा आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |