Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 : कोल्हापूर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे पब्लिक हेल्थ मॅनेजर,शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक,एपिडेमियोलॉजिस्ट,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,स्टाफ नर्स,बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेनुसार आहे.या पदांची शैक्षणिक पात्रता, महत्वाच्या दिनांक,अर्ज प्रक्रिया या सर्व बाबत माहिती खालील लेखात दिलेली आहे प्रवर्गनिहाय पदांच्या रिक्त जागा आणि संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.कोल्हापूर महानगरपालिका भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे. कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत नोकरीची उमेदवारांना चांगली संधी आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा व नोकरी मिळवावी. भरती विषयी माहिती बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
कोल्हापूर महानगरपालिका भरती वयोमर्यादा
कोल्हापूर महानगरपालिका भरती मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना किमान वयोमर्यादा 18 वर्ष व कमाल वयोमर्यादा 38 वर्ष आहे. आणि राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 43 वर्ष दिलेली आहे.
कोल्हापूर महानगरपालिका भरती अर्ज शुल्क
कोल्हापूर महानगरपालिका भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क लागणार नाही मात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या वेळी रुपये शर्ती मान्य असल्याबाबतचा 100/- च्या स्टॅम्प पेपरवर लिहून नोटरी करून द्यावा लागणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता
कोल्हापूर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांच्या एकूण 40 जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे पब्लिक हेल्थ मॅनेजर,शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक,एपिडेमियोलॉजिस्ट,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,स्टाफ नर्स,बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार खालील टेबल मध्ये बघून घ्यायची आहे. व पात्र इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पब्लिक हेल्थ मॅनेजर | एमबीबीएस किंवा हेल्थ सायन्स मधून पदवीधर |
शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक | आरोग्य सेवा प्रशासन मध्ये MPH/MHA/MBA सह वैद्यकीय पदवीधर MBBS/BAMS/BHMS/BUMS/BDS |
एपिडेमियोलॉजिस्ट | मेडिकल ग्रॅज्युएट |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 12वी आणि डीएमएलटी |
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी | विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने समतुल्य घोषित केलेले इतर कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडील आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) किंवा महाराष्ट्र शासन मान्यता असलेला स्वच्छता निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) किंवा त्याच्या समक्ष अभ्यासक्रम पूर्ण करून पास असणे आवश्यक आहे. |
स्टाफ नर्स | जीएनएम/बीएससी नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक |
कोल्हापूर महानगरपालिका भरती अर्ज प्रक्रिया
कोल्हापूर महानगरपालिका भरती मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्जासोबत पुढील आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती जोडून विहित नमुन्यात अर्ज पाठवायचा आहे.
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, पदानुसार संबंधित कौन्सिल कडे रजिस्ट्रेशन केलेले नोंदणी प्रमाणपत्र, जन्म नोंदीचा पुरावा असलेले प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, तसेच इतर अनुषंगिक कागदपत्रे, पासपोर्ट आकारातील 02 फोटो, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जातीचे प्रमाणपत्र, संगीत केलेल्या छायाच प्रति जोडाव्यात.
एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी वेगवेगळे आणि पूर्ण अर्ज करावे.
अर्ज सादर करताना सध्या सुरू असलेली ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक अचूक नोंदवायचे आहे, तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवायचे आहे. ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचे नाव लिफाफ्यावर स्पष्टपणे उल्लेख करायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : मा.आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नावे ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर.
कोल्हापूर महानगरपालिका भरती मासिक वेतन
कोल्हापूर महानगरपालिका भरती मध्ये 18000/- ते 35000/- रुपये पदांनुसार वेतन दिले जाणार आहे. पदांनुसार वेतन मूळ जाहिरातमध्ये बघायचे आहे.
कोल्हापूर महानगरपालिका भरती निवड प्रक्रिया
पदाच्या आवश्यक qualifying exam मधील अंतिम वर्षांच्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे पदाकरिता आवश्यक शैक्षणिक राहते पेक्षा अधिक शैक्षणिक राहाता असल्यास तसेच संबंधित पदासाठी निगडित अनुभव यामधील मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीप्रमाणे उमेदवारांची प्रवर्गानुसार गुणांकन यादी तयार करून उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती मुळ जाहिरातीत नमूद करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
Kolhapur Mahanagarpalika Bharti Vacancy Details
ऑफलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 28 सप्टेंबर 2024 पासून या भरतीसाठी अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |