Janata Shikshan Sanstha Pune Bharti 2024
Janata Shikshan Sanstha Pune Bharti 2024 : जनता शिक्षण संस्था पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. जनता शिक्षण पुणे मध्ये शिक्षक, लिपिक, सेवक या पदांकरिता भरती प्रकाशित करण्यात आली आहे एकूण विविध 51 रिक्त पदांची ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
51 रिक्त पदांसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे शैक्षणिक पात्रते विषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदाकरिता अर्ज करायचा आहे.जनता शिक्षण संस्था पुणे मध्ये भरती करिता उमेदवारांना अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 08 जून 2024 आहे.देय तारखे नंतर कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन आलेले अर्ज या भरतीसाठी स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व दिलेल्या तारखेच्या आत त्वरित आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहे.शिक्षण संस्था पुणे अंतर्गत नोकरी करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा नोकरीच्या विविध अपडेट्स साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या www.mahasarkarnaukri.in
जनता शैक्षणिक संस्था पुणे भरती अर्ज शुल्क
जनता शैक्षणिक संस्था अंतर्गत अर्ज करण्याची कोणत्याही प्रकारची अर्ज फी भरण्याची आवश्यकता नाही कारण, मूळ जाहिरातीमध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्कविषयी माहिती दर्शविलेली नाही अर्ज शुल्क बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात संपूर्ण वाचावी.
जनता शैक्षणिक संस्था पुणे वयाची अट
जनता शैक्षणिक संस्थेच्या मूळ जाहिरातीत उमेदवारांना वयाची अट दिलेली नाही त्यामुळे अर्ज करण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही पदानुसार पात्र असलेले उमेदवार या भरती साठी आपला अर्ज सादर करू शकतात.(मूळ जाहिरात बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरातीसमोर दिलेल्या लिंकवर क्लिक करून पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी)
रिक्त पदांचा तपशील
जनता शिक्षण संस्था पुणे भरती अंतर्गत एकूण 51 रिक्त पदांची भरती होणार आहे.जाहिरातीमध्ये नमूद विविध रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे रिक्त पदांच्या आवश्यक माहितीकरिता दिलेली (मूळ जाहिरात पहावी)
पदाचे नाव | रिक्त पदांच्या जागा |
लिपिक | 06 जागा |
शिक्षक | 40 जागा |
सेवक | 05 जागा |
जनता शैक्षणिक संस्था पुणे भरती 2024 शैक्षणिक पात्रता
जनता शैक्षणिक संस्था पुणे भरती येथे एकूण 51 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित झाली आहे या 51 रिक्त पदांकरिता शैक्षणिक पात्रता त्यांच्या अवश्यकतेप्रमाणे आहे.
खाली दिल्याप्रमाणे उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक वाचावी शैक्षणिक पात्रतेची अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे संपूर्ण माहितीसाठी दिलेली पीडीएफ वाचावी.
पदाचे नाव | लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता |
लिपिक | बी.कॉम/बीए उमेदवार |
शिक्षक | बीए/एमए/बी.एस.सी/बी.एड/डी.एड उमेदवार |
सेवक | या पदासाठी उमेदवार 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
जनता शैक्षणिक संस्था पुणे भरती अर्ज प्रक्रिया
जनता शैक्षणिक संस्था पुणे मध्ये भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या 08 जून 2024 या तारखेपर्यंत संस्था कार्यालयामध्ये जाऊन जमा करावे.
अर्ज जमा करताना सोबत आवश्यक ओळखपुरावा व शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहे.अर्जातील माहिती खरी व स्पष्ट असावी अपूर्ण अर्ज नाकारले जाऊ शकतात.
अर्जातील माहिती अचूक व संपूर्ण भरावी जसे कि, आपले नाव पालकांचे नाव, पत्ता, ओळखीच्या पुराव्यानुसार व शैक्षणिक कागदपत्रामध्ये आहेत त्याप्रमाणे व शैक्षणिक पात्रतेची माहिती.
अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी ऑफलाईन सादर करावे शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.दिलेल्या तारखेच्या अगोदरच आपला अर्ज लवकर ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे.
भरतीच्या अधिक माहितीसाठी खाली मूळ जाहिरात दिलेली आहे उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीसमोर दिलेल्या लिंकवर क्लिक करून पीडीएफ वाचावी.
पदांसाठी अटी व शर्ती :
उपशिक्षक पदांची नियुक्ती ही तात्पुरती व हंगामी स्वरुपाची असणार आहे.
उमेदवारांना नियुक्त केलेल्या पदावर कायमस्वरूपी सेवेत राहण्याचा हक्क सांगता येणार नाही किंवा न्यालायाकडे दाद मागता येणार नाही.
पदांच्या दिलेल्या संख्येमध्ये कमी जास्त बदल करण्याचा हक्क संस्थेचा असेल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर ऑफलाईन अर्ज पाठवायचा आहे.
जनता शैक्षणिक संस्था पुणे भरती महत्वाच्या दिनांक
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2024 आहे या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही
- मुलाखतीस उपस्थित राहण्याची तारीख 12 जून 2024 आहे.
जनता शैक्षणिक संस्था पुणे भरती महत्वाच्या लिंक
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
जनता शैक्षणिक संस्था पुणे पदांची निवड प्रक्रिया
जनता शिक्षण भरती संस्था पुणे येथे पदांची निवड प्रक्रिया उमेदवारांच्या मुलाखतीतून केली जाणार आहे. 12 जून 2024 या तारखेला सकाळी 09 ते 05 या कालावधीत शिक्षण संस्थेच्या संबंधित जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता : दिलेल्या मूळ जाहिरातीतील पत्त्यावर
उमेदवारांना मुलाखतीसाठी हजार राहण्याकरिता कोणताही भत्ता दिला जाणार नाही मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहायचे आहे.