IWAI Bharti 2024 : शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांकरिता उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे. भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. महत्त्वाचे म्हणजे 10वी उत्तीर्ण उमेदवारांनाही या भरतीमध्ये अर्ज करण्याची संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी Inland Waterways authority of India यांच्या सरकारी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. विविध पदांच्या एकूण 11 पदांसाठी 37 जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. पदांचे नाव असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्वेअर, परवाना इंजिन ड्रायव्हर, जूनियर अकाउंट ऑफिसर, ड्रेज कंट्रोल ऑपरेटर, स्टोअर कीपर, मास्टर सेकंड क्लास, स्टाफ कार्ड ड्रायव्हर, मास्टर 3rd क्लास, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), टेक्निकल असिस्टंट, सिव्हिल मेकॅनिकल, मरीन इंजीनियरिंग, नवल आर्किटेक्ट असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. सरकारी व खाजगी नोकरी भरतीच्या अपडेट बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण अर्ज शुल्क
भरती अर्ज करण्याची सर्वसाधारण/ओबीसी क्रिमी आणि नॉन क्रिमीलेयर उमेदवारांना अर्जाचे 500/- रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्ग एससी/एसटी पीडब्ल्यूडी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 200/-रुपये अर्ज शुल्क लागणार आहे.
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण वयोमर्यादा
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान दिलेली आहे वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी दिलेली आहे संपूर्ण माहितीसाठी नोटिफिकेशन वाचा.
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण शैक्षणिक पात्रता
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण ( Inland Waterways authority of India ) मध्ये विविध पदांकरिता भरती प्रसारित करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव हे असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्वेअर, परवाना इंजिन ड्रायव्हर, जूनियर अकाउंट ऑफिसर, ड्रेज कंट्रोल ऑपरेटर, स्टोअर कीपर, मास्टर सेकंड क्लास, स्टाफ कार्ड ड्रायव्हर, मास्टर 3rd क्लास, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), टेक्निकल असिस्टंट, सिव्हिल मेकॅनिकल, मरीन इंजीनियरिंग, नवल आर्किटेक्ट आहे शैक्षणिक पात्रता या भरतीमध्ये 10वी पास संबंधित ट्रेडमध्ये बीई/बी.टेक. पदवीधारक, वाणिज्य शाखेतील पदवीधर पदांनुसार वेगवेगळी पात्रता दिली आहे पदांची शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी उमेदवारांनी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण मासिक वेतन
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण भरती मध्ये पदांकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांना मासिक वेतन 18,000/- ते 1,77,500/- रुपये पगार मिळणार आहे.
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण अर्ज प्रक्रिया
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये भरती होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक द्वारे अधिकृत वेबसाईट द्वारे अर्ज करायचा आहे अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. अर्ज करताना लागणारी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे प्रमाणपत्रे पासपोर्ट आकारातील फोटो सही अपलोड करून अर्जाचे शुल्क भरणे अत्यावश्यक आहे.
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण निवड प्रक्रिया
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग भरती निवड प्रक्रियेची संपूर्णपणे माहिती मूळ जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली आहे निवड प्रक्रिया ची माहिती बघण्याकरिता खालील लिंक द्वारे मुळ जाहिरात मध्ये निवड प्रक्रियेची माहिती बघून घ्यायची आहे.
Inland Waterways Authority Of India Recruitment Notification 2024
पदांकरिता अर्ज प्रक्रियेची सुरुवात : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2024 या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे शेवटच्या तारखेनंतर अर्जाची लिंक बंद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि त्वरित अर्ज ऑनलाईन करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |