Indian Coast Guard Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांना भारतीय तटरक्षक दल मध्ये नोकरीची संधी; विविध पदांकरिता अर्ज प्रक्रिया सुरू!!

Indinan Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दलमध्ये एकूण 06 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. सहा रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे फायरमन, सिव्हिलियन एमटी ड्रायव्हर, फोर्क लिफ्ट ऑपरेटर आणि शीट मेटल वर्कर (कुशल), सुतार असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता व संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मोळ जाहीराच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचू शकता. भारतीय तटरक्षक दलमध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज हे 30 दिवसांच्या आत पाठवायचे आहे. भरती केंद्र शासकीय अंतर्गत येते. राज्य शासकीय व केंद्रशासकीय सरकारी नोकरीच्या अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा. www. mahasarkarnukri.in

भारतीय तटरक्षक दल अर्ज शुल्क

भारतीय तटरक्षक दल मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

भारतीय तटरक्षक दल वयोमर्यादा

भारतीय तटरक्षक दल विभाग मध्ये भरती होण्यासाठी सर्वसाधारण उमेदवार 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा देण्यात आली आहे. शासकीय नियमाप्रमाणे उमेदवारांना वयोमर्यादीची सूट दिली जाणार आहे.

भारतीय तटरक्षक दल शैक्षणिक पात्रता

भारतीय तटरक्षक दल (इंडियन कोस्ट गार्ड) मध्ये सहा रिक्त पदांसाठी ही भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि सहा रिक्त पदांसाठी पदांची नावे फायरमन, सिव्हिलियन एमटी ड्रायव्हर, फोर्क लिफ्ट ऑपरेटर आणि शीट मेटल वर्कर (कुशल), सुतार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खाली टेबल मध्ये बघून घ्यायची आहे आणि पात्रतेनुसार अर्ज करायचे आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
फायरमनमान्यता प्राप्त मंडळातून 10 वी किंवा समकक्ष पास (शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त व कठोर कर्तव्य पार पाडण्याकरिता सक्षम असणे आवश्यक आहे)
सिव्हिलियन एमटी ड्रायव्हरमान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक 2) जड आणि हलक्या वाहनांसाठी ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे मोटार वाहन चालविण्याचा 02 दोन वर्षांचा अनुभव असावा 3) मोटर यंत्रणेचे ज्ञान
फोर्क लिफ्ट ऑपरेटरमान्यताप्राप्त मंडळाकडून 10 किंवा समकक्ष परीक्षा पास 2) ITI प्रमाणपत्र
3) हेवी ड्युटी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे
सुतारमान्यता प्राप्त मंडळातून 10 वी किंवा समकक्ष पास आयटीआय प्रमाणपत्र, ट्रेड प्रवेश परीक्षा उत्तीर्ण
शीट मेटल वर्कर (कुशल)उमेदवार मान्यता प्राप्त मंडळातून 10 वी किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असावा
2) आयटीआय प्रमाणपत्र
3) ट्रेड प्रवेश परीक्षा उत्तीर्ण
भारतीय तटरक्षक दल अर्ज प्रक्रिया

भारतीय तटरक्षक दल मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 दिवसाच्या आत आहे.
उमेदवारांनी अर्ज खालील पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवायचा आहे.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र NE, CSO (P&A) साठी, सिंथेसिस बिझनेस पार्क, सहावा मजला, श्राची बिल्डिंग राजरहाट, न्यू टाऊन, कोलकाता – 700161 या पत्त्यावर अर्ज सादर पाठवायचे आहे.

भारतीय तटरक्षक दल निवड प्रक्रिया

भारतीय तटरक्षक दल मध्ये निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती करिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

Indian Coast Guard Recruitment Notification 2024

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 10 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 दिवसांच्या आत उमेदवारांना अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे अर्ज लवकरात लवकर पाठवता येईल याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.

सविस्तर मूळ जाहिरात (शॉर्ट नोटीस)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉