Income Tax Department Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांना आयकर विभागात नोकरीची संधी! पूर्ण माहिती पहा व अर्ज ऑनलाईन करा!! |वेतन 56,900/-

Income Tax Department Bharti 2024

Income Tax Department Bharti 2024 : पीआर चीफ आयकर आयुक्त CCA, तामिळनाडू आणि पुड्डुचेरी, चेन्नई अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 25 रिक्त पदांची भरती प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे कॅन्टीन अटेंडंट आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी व संपूर्ण माहिती करिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिरात च्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. आयकर विभाग भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 22 सप्टेंबर 2024 आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा व शासकीय नोकरी मिळवावी. सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा.www. mahasarkarnukri.in

आयकर विभाग भरती वयोमर्यादा

आयकर विभाग भरती मध्ये सहभागी होण्यासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना 18 वर्ष ते 25 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना वयोमर्यादित 03 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे वयोमर्यादित सूट दिलेली आहे शासकीय नियमानुसार

आयकर विभाग भरती अर्ज शुल्क

आयकर विभाग भरती अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रवर्गाच्या उमेदवारांना कोणतीही अर्ज फी भरावी लागणार नाही.

आयकर विभाग भरती शैक्षणिक पात्रता

आयकर विभाग अंतर्गत एकूण 25 रिक्त जागांसाठी भरती प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे कॅन्टीन अटेंडंट असे आहे या पदाची शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून शैक्षणिक पात्रता नुसार भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करायचे आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कॅन्टीन अटेंडंटउमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
आयकर विभाग भरती अर्ज प्रक्रिया

आयकर विभाग भरती अर्ज ऑनलाईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करता येईल. शेवटच्या तारखे अगोदर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2024 आहे.

ऑनलाइन भरती अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करावी.

ऑनलाइन अर्ज करताना अपलोड करण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

  • मॅट्रिक्युलेशन (10 वी ) प्रमाणपत्र.
  • ईडब्ल्यूएस ओबीसी एससी उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र.
  • पासपोर्ट आकारातील फोटो ज्या खाली पूर्ण नाव आणि फोटो काढण्याची तारीख असावी.
  • स्कॅन केलेली सही
  • ओळख प्रमाणपत्र
  • आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स मतदान ओळखपत्र केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे लागू केलेले ओळखपत्र
आयकर विभाग भरती निवड प्रक्रिया

आयकर विभाग निवड प्रक्रिया 02 टप्प्यात करण्यात येणार आहे. अर्जांची पडताळणी करून पात्र उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल.

लेखी परीक्षा मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्ट तयार केली जाईल.
मॅट्रिक्युलेशन 10 वी किंवा समकक्ष परीक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या आधारावर सर्व अर्ज मधून 500 उमेदवारांना श्रेणीनुसार 20 पात्र अर्ज पुढील प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट करण्यात येईल.
आणि उमेदवारांची वस्तुनिष्ठ प्रकाराची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल.परीक्षा वेळ 2 तास असेल.

निवड प्रक्रियेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळे जाहिरात च्या लिंक समोर क्लिक करून मुळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.

Income Tax Department Recruitment Vacancy Details

ऑनलाईन अर्जाची लिंक सुरुवात होण्याची तारीख : 08 सप्टेंबर 2024 पासून भरती अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची नोंद घ्यावी व त्वरित अर्ज करावे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटभेट द्या

इतरांनाही शेअर करा
error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉