Fisheries Department Maharashtra Bharti 2024 : मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024 आहे रिक्त पदांचे नाव हे उपजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आहे या पदांची शैक्षणिक पात्रता,महत्वाच्या तारीख,अर्ज प्रक्रिया,वेतनश्रेणी व इतर आवश्यक माहिती खालील लेखात काळजीपूर्वक वाचावी सरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही असल्यास महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभाग मध्ये नोकरीची उमेदवारांना ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे, या संधीचा पूर्णपणे लाभ घ्यावा व नोकरी मिळवावी सदरील भरतीचे नोकरी ठिकाण मुंबई, महाराष्ट्र असणार आहे.सरकारी नोकरीच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती अर्ज शुल्क
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याने अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती वयोमर्यादा
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरतीमध्ये उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती शैक्षणिक पात्रता
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 12 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे उपजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता M.Sc. in Marine Science, Bachelor in Fisheries Science, या क्षेत्रात पदवीधर असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असावे. शैक्षणिक पात्रता व इतर अधिक माहिती बघण्यासाठी खालील दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती अर्ज प्रक्रिया
मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र भरतीचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे दिलेल्या खालील पत्त्यावर अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करायचे आहे. ऑफलाइन अर्ज करताना उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक प्रमाणपत्रांची प्रत अर्जासोबत जोडावी.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय विभाग मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई- सी 14 मित्तल टॉवर, सी विंग, 2 मजला, नरिमन पॉईंट, मुंबई -400 021
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र मासिक वेतन
उपजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदासाठी नियुक्त केलेल्या उमेदवारास 35,000/- रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती निवड प्रक्रिया
वरील पदासाठी पात्र असणार्या उमेदवारांची मुलाखत घेऊन निवड केली जाईल निवड प्रक्रिया व इतर अधिक माहिती खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.
Matsya Vibhag Maharashtra Bharti Important Dates
ऑफलाईन अर्जाची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज स्वीकारणे सुरू झालेले आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2024 आहे इच्छुक व पात्र असणार्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉइन करण्यासाठी | येथे क्लिक करा |