FDA Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासन अंतर्गत अन्न व प्रशासन विभागातील प्रयोग शाळांमध्ये नागपूर/ मुंबई/ छत्रपती संभाजीनगर व इतर जिल्ह्यात विभागातील रिक्त पदावर जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. अन्न व औषध प्रशासन अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहिरात प्रसारित केली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ असे आहे. भरती जाहिरात राज्यस्तरीय निवड समिती, मुंबई तथा आयुक्त अन्न व प्रशासन मुख्यालय मुंबई, द्वारे प्रसारित झाली आहे. पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर मूळ जाहिरात अर्ज करण्या अगोदर काळजीपूर्वक वाचायची आहे. अन्न व प्रशासन विभाग भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे. सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
अन्न व औषध प्रशासन विभाग अर्ज शुल्क
अन्न व औषध प्रशासन विभाग भरती अर्ज करण्यासाठी अराखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना रु1000/- आणि 900/- रु. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क लागणार आहे.
अन्न व औषध प्रशासन विभाग वयोमर्यादा
अन्न व औषध प्रशासन विभाग भरतीमध्ये 18 ते 38 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभाग शैक्षणिक पात्रता
अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत एकूण 56 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे रिक्त पदांची शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेनुसार आहे वरिष्ठ तांत्रिक सहायक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतील द्वितीय श्रेणी मधील पदवी किंवा औषध निर्माण शास्त्र पदवीधारक.विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची औषध निर्माण शास्त्र शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र (chemistry) किंवा जीवशास्त्र (bio chemistry) पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री) किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील द्वितीय श्रेणीमधील पदवी. प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणातील किमान 18 महिन्यांचा अनुभव असावा. शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
अन्न व औषध प्रशासन विभाग अर्ज प्रक्रिया
अन्न व औषध प्रशासन विभाग भरती मध्ये अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहे अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे अपलोड करावी.
अन्न व औषध प्रशासन विभाग मासिक वेतन
38,600 ते 1,22,800/- रुपये पर्यंत पदांनुसार मासिक वेतन वेगवेगळे आहे PDF जाहिरात वाचावी.
अन्न व औषध प्रशासन विभाग निवड प्रक्रिया
उमेदवारांची पदानुसार स्वतंत्र वेळापत्रकानुसार ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे आवश्यकतेनुसार वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास त्याच वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध होतील निवड प्रक्रियेची संपूर्णपणे माहिती मुळ जाहिरातीमध्ये नमूद आहे संपूर्ण माहिती करिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
FDA Mumbai Bharti Vacancy Details 2024
अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 23 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्जाची सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घेवून अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |