DTP Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!

DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 289 रिक्त जागांची भरती पुणे/ कोकण/नाशिक/औरंगाबाद /नागपूर/अमरावती विभागात केली जाणार आहे पदांचे नाव उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक असे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लेखात दिलेली आहे. माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराती समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2024 अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती अर्ज शुल्क

खुल्या वर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क 1000/- रू. आकारले गेले आहे. आणि राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क 900/- रू. माजी सैनिकांना शुल्क द्यावे लागणार नाही.

महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती वयोमर्यादा

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती मध्ये अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे व 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार खेळाडू उमेदवार आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांसाठी वयोमर्यादित 05 वर्ष सूट राहील तसेच दिव्यांग उमेदवारांना वयोमर्यादित 05 वर्ष इतकी सूट राहील.

महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती मासिक वेतन
पदाचे नाववेतन
उच्च श्रेणी लघुलेखक41800/- ते 132300/-रु.
निम्न श्रेणी लघुलेखक 38600/- ते 122800/-रु.
रचना सहाय्यक38600/- ते 122800/-रु.
महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात एकूण 289 पदे भरण्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या भरती जाहिरात अंतर्गत उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक पदे भरली जाणार आहेत या पदांची शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पहायची आहे व शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उच्च श्रेणी लघुलेखकमान्यताप्राप्त मराठी इयत्ता 10 वी पास आणि लघु लेखनाचा किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनातील वेग 30 शब्द प्रति मिनिट या पात्रतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र अर्हता धारण केलेले उमेदवार
निम्न श्रेणी लघुलेखकमाध्यमिक शाळा प्रमाण परीक्षा उत्तीर्ण (SSC) व लघुलेखनातील वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनातील वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंगलेखनातील वेग 30 श.प्र मी. या पात्रतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक
रचना सहाय्यकस्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधून मान्यताप्राप्त संस्थेकडील 03 वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे
महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग मध्ये भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे दिलेल्या खाली ऑनलाइन अर्ज लिंक द्वारे अर्ज करता येईल. अर्जामधील सर्व आवश्यक पात्रता अटी याबाबत संपूर्ण माहिती द्यावी अपूर्ण अर्ज असल्यास अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे. व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 30 जुलै 2024 या तारखेपासून खुली होणार आहे.

महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती निवड प्रक्रिया

महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग निवड प्रक्रियेच्या माहिती करिता खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातच्या समोरील लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात बघायची आहे व निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती वाचायची आहे.

DTP Maharashtra Recruitment Notification 2024

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 30 जुलै 2024 पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024 आहे या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.

ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 30 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉