Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2024 : देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदांच्या एकूण 60 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव लिपिक असे आहे, या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे पदानुसार शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिराती समोर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. देवगिरी नागरी सहकारी बँक लि.छ. संभाजी नगर बँक भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे. बँकमध्ये नोकरीची उमेदवारांना चांगली संधी प्राप्त झाली आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा व बँकेत नोकरी मिळवावी भरती विषयी अपडेट जाणून घेण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnaukri.in
देवगिरी नागरी सहकारी बँक लि.अर्ज शुल्क
देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क रु.700/- (18% जि.एस.टी.) + बँक व्यवहार शुल्क लागणार आहे. (अर्ज शुल्क ना परतावा आहे)
देवगिरी नागरी सहकारी बँक लि.वयोमर्यादा
देवगिरी नागरी सहकारी बँक लि.औरंगाबाद मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 35 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.(मूळ जाहिरात बघावी)
देवगिरी नागरी सहकारी बँक लि.शैक्षणिक पात्रता
देवगिरी नागरी सहकारी बँक लि.छ.संभाजीनगर मध्ये रिक्त पदांच्या एकूण 60 जागांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव लिपिक असे आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबलमध्ये बघून घ्यायची आहे व शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
लिपिक | मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी, संगणकाचे ज्ञान आणि मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
देवगिरी नागरी सहकारी बँक लि.अर्ज प्रक्रिया
अर्ज नोंदणी करताना उमेदवारांनी स्वतःचा आधार क्रमांक, नाव, वडिलांचे नाव, आडनाव, सद्यस्थितीत सुरू असलेला मोबाईल क्रमांक, वैध ई-मेल आयडी भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर समोरील पेजवर युजर आयडी आणि पासवर्ड दिसेल अर्ज करताना नमूद केल्या गेलेल्या मोबाईल नंबर वर SMS सुद्धा प्राप्त होईल. भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सांभाळून ठेवावा. युजर आयडी व पासवर्ड विसरल्यास संकेतस्थळावरून Forgot User ID & पासवर्ड करून पुन्हा नवीन तयार केला जाईल.
देवगिरी नागरी सहकारी बँक लि. निवड प्रक्रिया
उमेदवारांची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा छत्रपती संभाजी नगर येथे घेण्यात येणार आहे. व उमेदवारांच्या कागदपत्रांची पूर्ण छाननी व तपासणीनंतरच त्यांची वैधता पाहून उमेदवारांची पात्रता निश्चित केली जाईल.
पात्रता धारण करत नसणार्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल. पडताळणी नंतर उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल.
मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
ऑनलाइन परीक्षा नंतर 03 तासांच्या आत उत्तर सूची संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल, त्यासंबंधी काही आक्षेप असल्यास पुढील 03 दिवसांच्या आत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नमुन्यानुसार लेखी पत्राद्वारे कळवावे लागेल. आवश्यकता असल्यास योग्य तो बदल करून सुधारित उत्तर सूची परीक्षा झाल्यानंतर 05 दिवसाच्या आत संकेतस्थळावर प्राप्त होईल. निवड प्रक्रियेच्या संपूर्णपणे माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
Deogiri Nagari Sahakari Bank Bharti Vacancy Details
ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 04 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे.
अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज भरायचे आहेत शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व शेवटच्या तारखेच्या आत अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा | अर्ज येथे करा |