Brihan mumbai Mahanagarpalika Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील करनिर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापनेतील गट-क मधील “निरीक्षक” या संवर्गातील पदांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 178 पदांच्या जागा सरळसेवेने भरण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html या संकेतस्थळावर जाहिरातीमध्ये नमूद असलेल्या आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव निरीक्षक असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. महानगरपालिका अंतर्गत उमेदवारांसाठी परमनंट नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावे. सरकारी आणि गाजगी नोकरीच्या भरती अपडेट्स बघण्यासाठी दररोज तुमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज शुल्क
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज शुल्क अराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये 1000/- भरावे लागणार आहे.आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रुपये 900/- लागणार आहे.अनाथ आरक्षणांतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी रुपये.900/- अर्ज शुल्क आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका वयोमर्यादा
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये अराखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्ष मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय 18 वर्ष ते 43 वर्ष अशी वयोमर्यादा दिलेली आहे दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 45 वर्ष वयोमर्यादा आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका शैक्षणिक पात्रता
बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये रिक्त पदांच्या एकूण 178 रिक्त जगांकरिता भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव हे निरीक्षक गट- क असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता 1) उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 2) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेमध्ये 100 गुणांचा मराठी विषय निम्नस्तर किंवा उच्चस्तर घेऊन उत्तीर्ण असावा.उमेदवारांकडे मराठी आणि इंग्रजी भाषेतील सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र प्रत्येकी 30 शब्द प्रति मि. टंकलेखन गती असणे आवश्यक आहे.संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खालील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज प्रक्रिया
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पदासाठी असलेल्या विहित अर्हता अटींची पूर्तता करीत असल्याची खात्री करायची आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
भरती प्रक्रियेची परीक्षा प्रवेश पत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने ई-मेल आयडी द्वारे देण्यात येणार आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका मासिक वेतन
सरळ सेवेने भरावयाच्या निरीक्षक संवर्गातील पदांसाठी वेतनश्रेणी (सुधारित) स्तर M 17 – रु. 29,200 ते 92,300 रुपये मिळेल.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये निरीक्षक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार असलेल्या अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेतली जाईल. परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित सामाजिक समांतर आरक्षणाप्रमाणे निवड यादी तयार करण्यात येईल.
निरीक्षक पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचा प्रश्नपत्रिकाचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या इयत्ता 12वी दर्जाच्या समान राहील.
ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप मुळ जाहिरातीमध्ये नमूद केलेले आहे(निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीत नमूद आहे संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे)
BMC Bharti 2024 Vacancy Details
ऑनलाईन अर्ज लिंक सूरू होण्याची तारीख : 20 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2024 तारखेपर्यंत ऑनलाईन माध्यमातून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज त्वरित ऑनलाईन सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |