BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत बा.य.ल. नायर धर्म रुग्णालय व टो.रा.वैद्यकीय महाविद्यालय आपत्कालीन प्रयोगशाळासाठी तंत्रज्ञ या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये तंत्रज्ञ या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.भरतीच्या अपडेट पाहण्याकरिता दररोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
बृहन्मुंबई महानगरपालिका वयोमर्यादा
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये उमेदवारांना भरतीसाठी 18 ते 33 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज शुल्क
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही मात्र निवड झालेल्या उमेदवारांनी रुपये 500/- मुद्रांक शुल्कावर बंधपत्र नियुक्तीच्या आधी देणे आवश्यक आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका शैक्षणिक पात्रता
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत बा.य.ल. नायर धर्म रुग्णालय व टो.रा.वैद्यकीय महाविद्यालय अपात्कालीन प्रयोगशाळामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित केली आहे रिक्त पदांचे नाव हे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील टेबलमध्ये बघून पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतील बीएससी पदवी धारण करणारा असावा व मान्यता प्राप्त विद्यापीठाची (Maharashtra State Board Of Technical Education) डी.एम.एल.टी. पदविका (Diploma In Laboratory Technology) पदविका पास असावा BSc+DMLT किंवा उमेदवारांनी 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडील निमवैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन या विषयात bachelor of paramedical technology in laboratory medicine पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे |
बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज प्रक्रिया
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने खालील दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेआधी पाठवायचे आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत सादर करायच्या आहे.
अर्ज करण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड, रहिवासी पुरावा,ओळख पुरावा आधार कार्ड/ वाहन चालक परवाना / पासपोर्ट/मतदान ओळखपत्र माध्यमिक शालांत एसएससी परीक्षा गुण पत्रिका, उच्च माध्यमिक एचएससी परीक्षा गुणपत्रिका,पदवी परीक्षा गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र (असल्यास), डी. एम.एल.टी. पदविका उत्तीर्ण प्रमाणपत्र, पासपोर्ट आकारातील अलीकडील काळातील 02 फोटो, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव यासंबंधीत असलेले इतर कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रे जोडावी.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ.एल.नायर रोड मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008 या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया
बृहन्मुंबई महानगरपालिका निवड उमेदवारांची शैक्षणिक अर्हतेप्रमाणे प्राप्त केलेल्या गुणांनुसार व मुलाखतीच्या गुणांनुसार निवड केली जाईल निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवायचे आहे आणि निवड प्रक्रियेची माहिती बघायची आहे
BMC Recruitment Notification 2024
अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 09 सप्टेंबर 2024 पासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024 या तारखेच्या आधी उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे शेवट आलेल्या अर्जाना विचारात घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व लवकरात लवकर अर्ज सादर करावे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
नमूना अर्ज | येथे क्लिक करा |
Online admission open