BDL Bharti 2024 : भारत डायनॅमिक्स लिमिटेड मध्ये रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे ट्रेड अप्रेंटीस असे आहे. ट्रेड अप्रेंटिस या पदाची शैक्षणिक पात्रता व संपूर्ण आवश्यक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. व शैक्षणिक पात्रतेनुसार पदाकरिता अर्ज सादर करायचे आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे. नोकरीची ही उत्तम संधी प्राप्त झालेली आहे या संधीचा पात्र व इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा व नोकरी मिळवावी. खाजगी व सरकारी नोकरी बद्दल नवीन माहितीकरिता दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड अर्ज शुल्क
भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरतीमध्ये अर्ज करण्याची उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड वयोमर्यादा
भारत डायनामिक्स लिमिटेड मध्ये भरती अर्ज करण्यासाठी 14 वर्ष ते 30 वर्ष वयोमर्यादा असलेले उमेदवार पात्र आहेत.ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्ष इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी /एसटी यांना 05 वर्ष वयोमर्यादेत सूट दिलेली आहे.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड शैक्षणिक पात्रता
भारत डायनामिक्स लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 117 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. जागांसाठी पदांचे नाव ट्रेड अप्रेंटिस असे आहे. या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करायचे आहे. शैक्षणिक पात्रता व आवश्यक अधिक माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ट्रेड अप्रेंटिस | मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
भारत डायनॅमिक्स लिमिटेड अर्ज प्रक्रिया
भारत डायनॅमिक लिमिटेड मध्ये भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अप्रेंटिस पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आधार कार्ड, 10वी गुणपत्रक, आयटीआय गुणपत्रक व आधारशी लिंक असलेले बँक खाते क्रमांक लागणार आहे.ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी दिलेली भरतीची नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड निवड प्रक्रिया
भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती मध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया गुणवत्ता यादीनुसार करण्यात येईल.
दहावी आणि आयटीआय गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Bharat Dynamics Limited (BDL) Bharti Vacancy Details 2024
ऑनलाइन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 28 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2024 दिलेली आहे, पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या शेवटच्या तारखे आधी अर्ज पाठवायचे आहे. दिलेल्या मुदतीनंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |